Horoscope Today: देवी उपासना फलदायी ठरेल, गुंतवणुकीतून योग्य परतावा मिळेल; वाचा आजचे राशीभविष्य

Today's Daily Horoscope Updates in Marathi: तुमचा आजचा दिवस कसा असेल, तुमची राशी काय सांगते, जाणून घ्या तुमचं संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Daily Horoscope Today TodaySaam TV
Published On

आजचे पंचाग

गुरुवार,२६ सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष, गुरुपुष्यामृत,दशमी श्राध्द.

तिथी- नवमी १२|२६ पर्यंत,नं.दशमी

रास- मिथुन १७|१३ नं. कर्क

नक्षत्र- पुनर्वसु

योग- परिघ

करण- गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - अनेक प्रकारचे लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. ज्या गुंतवणूक आधी केल्या असतील त्याच्यातून योग्य परतावा मिळाल्याचा आनंद आहे आणि तो आपण नातेवाईकांबरोबर साजरा कराल.

वृषभ - दवाखान्यात- आजारपणावर पैसे खर्च होतील. स्वतःची तब्येत आज सांभाळायला लागेल. त्यामुळे मनस्वास्थ्य सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. उपासनेवर भर दिल्यास दिवस चांगला जाईल.

मिथुन- गुरुपुष्यामृतासारखा सुंदर दिवस आज आहे. सुवर्ण खरेदी मधून फायदा होईल. स्वतःचे आयुष्य सुद्धा सोन्यासारखे उजळून निघेल इतकी सकारात्मकता आज तुमच्यामध्ये येईल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Chanakya Niti: या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कधीही चुकत नाहीत, वाचा एका क्लिकवर...

कर्क - मोठी गुंतवणूक सुवर्ण अलंकाराची खरेदीचा दिवस दिसतोय. पैशाची आवक जावक चांगली राहिल्यामुळे स्वास्थ चांगले राहील.

सिंह - शेजारी नातेसंबंध दृगोचर होतील. काही छोट्या गोष्टींमुळे त्यांच्याशी आज नवीन संबंध प्रस्थापित कराल. छोटे प्रवास किंवा एक दिवसाची सहल यामध्ये आपण सहभागी व्हाल असे दिसत आहे.

कन्या- नवीन गाडी खरेदीचे योग आहेत. त्याच्यापासून काही व्यवसाय आपण सुरू करणार आहात असे दिसते आहे. व्यापार व्यवसायामध्ये योग्य ती उंची गाठाल. यामध्ये कुटुंबीयांचे सहकार्य चांगले राहील.

तूळ- देवी उपासना आज फलदायी ठरेल. दिवसाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोने खरेदी कराल.आज खरेदी केलेले सोने अक्षय राहते. शेअर्स, लॉटरी तत्सम गोष्टी मधून पैसे मिळतील. ते आज योग्य ठिकाणी म्हणजे सोने खरेदी मध्ये गुंतवा.

वृश्चिक - आपल्यासाठी आज दिवस म्हणजे तारेवरची कसरत राहणार आहे. अनेक ठिकाणी आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. कामाचे ओझे अंगावर घेऊन पुढे जावे लागणार आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Bhagyank 4 Career : तुमचा जन्म, ४, १३, २२, ३१ या तारखांना झालाय का? मग तुम्ही आहात खूपच भाग्यवान, वाचा...

धनु- विनाकारण काही बालंट आणि कटकटी अंगावर येतील. जोडीदाराबरोबर मतभेद होतील पण दिवसा अखेरीस तुमचा समेट होईल. आपल्यावर अरिष्ट आल्यासारखे प्रसंग आज घडतील. मन सैरभैर होईल.

मकर - एखादी गोष्ट हातून सुटते आहे आणि आपल्याला मिळणार नाही किंवा ती गोष्टी संपली आहे असे दिसत असतानाच आपल्या हाती येते असा बराच अनुभव आपल्याला आहे. आज असाच दिवस आहे सुटले म्हणता म्हणता यश दाराशी येईल.

कुंभ - गुरुपुष्यामृत योग आहे. सोने दान, सोने खरेदी यासाठी खूप उत्तम संधी घेऊन आलेला आजचा दिवस आहे. याचबरोबर उपासनेमुळे आपल्या भाग्याचे नवे दालन खुले होईल. दोन्हीचा योग्य मेळ साधा आणि पुढे चला.

मीन - प्रवासाचा आणि दगदगीचा दिवस आज दिसत आहे. ऑफिसमध्ये सर्वांच्या सहकार्याने कामे पार पाडाल. धावपळ जरी असेल तरी झालेल्या कामावर आपण समाधानी असाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com