Bhagyank 4 Career : तुमचा जन्म, ४, १३, २२, ३१ या तारखांना झालाय का? मग तुम्ही आहात खूपच भाग्यवान, वाचा...

Numerology 4 Personality : ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक चार आहे.
numerology 4 people Career positive and negative side in Marathi
numerology 4 people Career positive and negative side in MarathiSaam TV
Published On

ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला आहे त्यांचा भाग्यांक चार आहे. हर्षल ह्या ग्रहाच्या अमलाखाली आपला अंक येतो. आपल्यामध्ये उत्साह, जोम, प्रगती ठासून भरलेली आहे. तुमचे आयुष्य अनेक चळवळीचे आहे असा वेळा असा बराच वेळ अनुभव येतो. आयुष्यामध्ये होणारे बदल हे चांगल्या करता हो. तुमच्या मनाची पातळी खूप चांगल्या वरच्या दर्जाची आहे.

मानवाच्या कल्याणासाठी बुद्धी आणि कृतीचा आपल्याकडून उपयोग केला जातो. समाजातील रूढी आणि बंधने जोडण्याचा प्रयत्न तुम्ही करता. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षित असते. लूच्चेगिरी, खोटेपण आवडत नाही. एक अंकाची दुसरी बाजू ४ आहे असे समजले जाते. एक या अंकाचे बरेचसे गुण आपल्यामध्ये आहेत.

तुम्ही धीट एकसारखे धीट नसाल पण संधी मिळाली, तर मात्र आपले गुण दाखवण्याची क्षमता आहे. आपले विचार दुसऱ्यावर लादण्याची क्षमता तुमच्या कृतीत आहे. तर विचार, विश्लेषण करण्याची वृत्ती, सूक्ष्म दृष्टिकोन ही वैशिष्ट्ये आहेत. सततचा विरोध किंवा वाद घालण्याच्या वृत्तीमुळे गुप्त शत्रू निर्माण होतात. आपल्याविषयी अनेकदा गैरसमज पसरतात.

numerology 4 people Career positive and negative side in Marathi
Numerology 1 Personality : अत्यंत गुणवान असतात १ भाग्यांकाचे लोक, जन्मताच घेऊन येतात आनंद, वाचा...

अनेक वेळा एककल्लीपणा जाणवतो. बऱ्याच वेळा हातचे राखून काही गोष्टी करता. वागण्यामध्ये कुशलता दाखवता. अपेक्षेपेक्षा जास्त लवकर अडचणींवर मात करता. इतरांपेक्षा जास्त विरोध आणि जास्त प्रतिकार तुम्ही करू शकता. स्वतःचे विचार कल्पना ठामपणे मांडून बरोबर आहे असे भासवता. सतत कामात मग्न राहणे हे तुम्हाला आवडते.

नोकरी व्यवसायाचा विचार केला तर - मशिनरी, इलेक्ट्रिसिटी वाहतूक करणारी यंत्रणा, इंजिनियर बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, शास्त्रज्ञ, कारखानदार, हॉटेल व्यवसाय हे येतात. तुमचा गुढविद्याकडेही ओढा आहे. त्यामुळे अध्यात्म, ज्योतीष , हस्तसामुद्रिक या विषयांकडे सुद्धा तुमची प्रगती होते.

प्रकृतीचा विचार केला तर- हर्षल या अंमलाखाली तुमचा अंक येत असल्यामुळे श्वसन क्रिया, त्यामुळे श्वास लागणे, गुदमरणे, दम्याचा त्रास, गुडघे, पोटऱ्या पाय या संबंधात आजार होऊ शकतात. संसर्गजन्य आजारापासून काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. मूत्रपिंड आणि यकृताबद्दलही त्रास संभवतो.

numerology 4 people Career positive and negative side in Marathi
Numerology Number 3 : या तारखांना जन्मलेले व्यक्ती आयुष्यात मिळवतात मोठं यश; तुमचा भाग्यांक कोणता?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com