Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार आहे. तर काहींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Horoscope in Marathi
HoroscopeSaam tv
Published On

पंचांग

गुरुवार,३० ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,दुर्गाष्टमी, गोपाष्टमी,कूष्मांड नवमी.

तिथी-अष्टमी १०|०७

नक्षत्र-श्रवण

रास-मकर

योग-शूल ०७|२१

गंड ३०|१६

करण-बवकरण

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - कोणतीही गोष्ट स्वस्थतेने आपण करत नाही. प्रत्येक गोष्टीचा उतावळेपणा, कामाचा उरक आणि लगेच व्हावी अशी इच्छा असते. आज काही गोष्टी आज, आत्ता, ताबडतोब असा काहीसा दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आघाडीवर रहाल. प्रवास होतील.

वृषभ - आयुष्य जगायचे तर आनंदासाठी असा आपला फंडा आहे. कला, मनोरंजन क्षेत्रामध्ये आज विशेषत्वाने सहभाग घ्याल.सकारात्मकता राहिल्यामुळे आपोआपच ओरा चांगला होऊन भाग्यकारक घटना आज घडतील. लक्ष्मी उपासना फलदायी ठरेल .

मिथुन - अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय आज सोडणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन कामे करा. बिन महत्वाच्या गोष्टी उद्या केल्या तरी चालतील. फसवणुकीची संभावता आहे. सावधगिरीने पावले उचला.

Horoscope in Marathi
Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

कर्क - माणसे जोडत जाणे आपल्या जवळच्या लोकांना स्नेह प्रेम देणे ही आपल्या राशीची खासियत आहे. आज संसारिक गोष्टी सहज घडतील. जोडीदाराबरोबर हितगुज साधाल. तसेच व्यावसायिक गोष्टींमध्ये सुद्धा प्रगती आहे.

सिंह - ठरवून आलेला दिवस नाही. येणाऱ्या गोष्टींना तोंड देणे हेच आपल्या हातात आहे. पण आपली हार न मानणारी रास आहे. ज्या काही गोष्टी असतील त्यामधून वाट काढत पुढे जाल. शत्रूंवर सुद्धा मात कराल.

कन्या - कला क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती आहे. एक वेगळा पराक्रम भौतिकदृष्ट्या आज आपल्याकडून होईल. नवनवीन शिकण्यासाठी विद्या मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगली संधी घेऊन आलेला आहे. विष्णू उपासना करावी.

Horoscope in Marathi
Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

तूळ - कितीही नाही म्हटले तरी आपल्या लोकांबरोबर जगण्यासाठी सुद्धा पैशालाच महत्त्व आहे हे आज जाणवेल. व्यवहाराने गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. जे आपल्याबरोबर प्रेम आहे आहे ते कुटुंबीयांबरोबर वाटून समाधानी रहाल. वाहन सौख्य उत्तम आहे.

वृश्चिक - सगळ्याच बाबतीत आज तुम्ही आघाडीवर राहण्याचे योग आहेत. कोणत्याही परिस्थितीने न डगमगता तोंड देणारी आपली रास आहे. कामाच्या ठिकाणी शाबासकीची विशेष थाप आपल्याला मिळेल. लहान प्रवास होतील.

धनु - राशीच्या नावाप्रमाणेच धन योग आहेत. हिशोबी बेहिशोबी दोन्ही कामे आज होतील. अर्थात धनाची पैशाची आवकजावक चांगली असल्यामुळे दिवस सुखद लागल्याची भावना होईल.

Horoscope in Marathi
Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

मकर - जे ठरवाल त्यामध्ये यश मिळेल आणि चिकाटी न सोडता नेटाने कामे कराल. कष्टाला पर्याय नाही हे यात जाणवेल.पण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ - नाही म्हणता म्हणता ती वेळ आलीच. अनेक दिवस जे आपण थांबला होतात अशा नको असणाऱ्या गोष्टी आज पुढे उभे राहतील. बंधन योग, विनाकारण खर्च कदाचित हॉस्पिटललायझेशन यामध्ये पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे.

मीन - खूप मोठ्या अशा आकांक्षा न घेता सुद्धा आयुष्य छान सुरळीत चाललंय ही भावना होईल. मोठी महत्त्वकांक्षा असणारी आपली रास नाही. पण भगवंताने खूप दिले आहेत असे अनेक लाभ होतील. जुन्या गुंतवणुकी फळाला येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com