
शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली असून यावेळी हा उत्सव नेहमीसारखा 9 दिवसांचा नसून तब्बल 10 दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रास सुरुवात होणार आहे. नवमीच्या दिवशी कन्या पूजन आणि त्यानंतर दशमीच्या दिवशी दसरा साजरा केला जातो.
या वर्षी मात्र ग्रह-नक्षत्रांचा अद्भुत संयोग घडत असून त्यामुळे नवरात्रोत्सवाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गजकेसरी योग, बुधादित्य योग आणि त्रिग्रही योगासह अनेक शुभ योग या काळात तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींवर नेहमीच माता दुर्गेची विशेष कृपा राहणार आहे. या राशींवर संकट येण्यापूर्वीच देवी त्यांचं रक्षण करते. त्या कोणत्या राशी आहेत ज्यांना माता दुर्गेचं अनन्यसाधारण प्रेम लाभतं.
माता शैलपुत्री आणि महागौरी यांचं वाहन वृषभ आहे आणि हाच वृषभ राशीचा प्रतीक चिन्हही आहे. त्यामुळे वृषभ राशी ही देवी दुर्गेच्या प्रिय राशींमध्ये गणली जाते. या राशीचे लोक मेहनती असतात आणि कोणत्याही अडचणीला धैर्याने सामोरं जातात. त्यांच्या अंगी साहस आणि पराक्रमाची कमतरता नसते.
कर्क राशीचे अधिपती चंद्रमा आहेत. देवी दुर्गेच्या तिसऱ्या शक्ती ‘चंद्रघंटा’च्या मस्तकावर अर्धचंद्राच्या आकारातील घंटा आहे. त्यामुळे कर्क राशीही माता दुर्गेच्या प्रिय राशींमध्ये मोडते. या राशीच्या लोकांना देवीच्या कृपेने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यश मिळतं. ते शांत स्वभावाचे आणि धार्मिक वृत्तीचे असतात.
देवी दुर्गेचं वाहन सिंह आहे आणि सिंह राशीचं प्रतीकही सिंहच आहे. म्हणूनच ही राशी देवीला अत्यंत प्रिय मानली जाते. सिंह राशीचे लोक ऊर्जावान, धार्मिक आणि उत्साही असतात. दुर्गामातेच्या कृपेने त्यांच्या नशिबाचा तारा नेहमीच उंचावत असतो. संकट आलं तरी हे लोक बुद्धीने ते दूर करतात आणि परिस्थिती सकारात्मक बनवतात.
कन्या राशीही माता दुर्गेची प्रिय राशी आहे. नवरात्रातील कन्या पूजनाशिवाय धार्मिक अनुष्ठान पूर्ण होत नाही यावरूनही या राशीचं महत्त्व लक्षात येतं. कन्या हीच माता दुर्गेचं प्रतीक मानली जाते. या राशीचे लोक धर्मकर्मात पुढे असतात आणि खूप ऊर्जावान असतात. जीवजंतू किंवा मनुष्य कोणालाही दुःख होत असेल तर ते सहन होत नाही.
माता दुर्गा नेहमी अस्त्रशस्त्रांनी सज्ज असतं आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद तिच्याकडे असते. धनु राशीचं प्रतीक धनुष्य आहे आणि धनुष्य हेच दुर्गामातेच्या हातातही आहे. या राशीचे अधिपती देवगुरु बृहस्पति आहेत. धनु राशीचे लोक कुटुंबाची सर्व गरज भागवू शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.