Grah Gochar Effect: सप्टेंबरमधील ग्रहांची चाल 'या' राशींना ठरू शकते धोकादायक; आर्थिक स्थिती बिघडणार?

Grah Gochar Effect 2024: सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 18 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता असते.
Grah Gochar Effect
Grah Gochar Effect saam tv
Published On

आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. ग्रहांचं गोचर हे काही राशींसाठी योग्य असतं, तर काही राशींसाठी ग्रहांचं राशी परिवर्तन धोकादायक ठरू शकतं.

सप्टेंबर महिन्यात 3 मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. यावेळी 4 सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 16 सप्टेंबर रोजी सूर्य बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 18 सप्टेंबर रोजी शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार असून यामुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ येण्याची शक्यता असते.

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या सहाव्या घरात सूर्य राहणार असून या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. मात्र महिन्याच्या मध्यानंतर जीवनातील समस्या वाढू शकतात. शत्रूकडून काम बिघडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आर्थिक संकटं येऊ शकतात.

Grah Gochar Effect
Surya Ketu Yuti: 18 वर्षांनी होणार सूर्य-मायावी केतूची युती; 'या' राशींच्या व्यक्तींना करियरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

मिथुन रास

सप्टेंबर महिन्यात तुम्हाला कौटुंबिक जीवनात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कोणत्याही मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. पैसे गुंतवण्यापूर्वी एखाद्या सुज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. कामाप्रती तुम्ही कोणताही निष्काळजीपणा महागात पडू शकतो.

कन्या रास

या राशीच्या पहिल्या घरात सूर्य प्रवेश करणार आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार असून अहंकार देखील वाढताना दिसेल. प्रवासादरम्यान चोरीची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात काही वाद होऊ शकतात. नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Grah Gochar Effect
Budh Nakshatra Gochar: सप्टेंबर महिन्यात बुध करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com