Zodiac Signs: चंद्र कन्या राशीत; काम, पैसा आणि नात्यांसाठी आजचा दिवस किती शुभ?

आज चंद्र कन्या राशीत असल्यामुळे काम, पैसा आणि संबंध याबाबत विशेष परिणाम दिसून येतील. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीतील चंद्र हा शिस्त, विचारपूर्वक निर्णय आणि स्थैर्य यांचे प्रतीक मानला जातो.
Horoscope
HOROSCOPE Saam Tv
Published On

आज १४ डिसेंबर २०२५ असून रविवार शांत विचार, आत्मपरीक्षण आणि नियोजनासाठी अनुकूल मानला जातो. आज चंद्र कन्या राशीत असल्यामुळे कामकाजात शिस्त, बारकावे आणि जबाबदारीला अधिक महत्त्व मिळणार आहे. व्यवहारिक निर्णय, घरगुती कामं आणि भविष्यासंबंधी योजना ठरवण्यासाठी हा दिवस उपयोगी ठरू शकतो. आजच्या दिवशी कोणत्या राशींना मिळणार लाभ ते पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथि – कृष्ण दशमी

  • नक्षत्र – चित्रा

  • करण – विष्टि

  • पक्ष – कृष्ण पक्ष

  • योग – सौभाग्य (११:४६:५६ AM पर्यंत)

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:56:25 AM

  • सूर्यास्त – 05:27:21 PM

  • चंद्र उदय – 01:51:14 AM

  • चंद्रास्त – 01:32:20 PM

  • चंद्र राशि – कन्या

  • ऋतु – हेमंत

Horoscope
Surya Gochar: 12 महिन्यांनंतर ग्रहांचा राजा गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींची तिजोरी संपत्तीने भरणार

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – मृगशिरा

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 04:08:29 PM ते 05:27:21 PM

यमघंट काल – 12:11:53 PM ते 01:30:45 PM

गुलिकाल – 02:49:37 PM ते 04:08:29 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:50:00 AM ते 12:32:00 PM

या राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी

कन्या

आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास आणि कामातील एकाग्रता वाढणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश सहज मिळू शकणार आहे.

Horoscope
Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

मकर

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. वरिष्ठांचा विश्वास मिळणार आहे. आर्थिक निर्णय घेताना आज योग्य मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहणार आहे. घराशी संबंधित निर्णय किंवा खर्च आज योग्य ठरू शकतात. मानसिक समाधान मिळेल आणि जवळच्या व्यक्तींशी नातेसंबंध अधिक दृढ होणार आहेत.

Horoscope
Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य योग; 'या' राशींना मिळू शकणार पद-प्रतिष्ठा

कर्क

भावनिक स्थैर्य राखण्यास आज ग्रहस्थिती मदत करणार आहे. घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित विचार पुढे नेण्यास चांगला काळ आहे. संयम ठेवल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे.

Horoscope
Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com