Panchang Today: आजपासून फाल्गुन महिन्याची सुरुवात; आनंद-उत्सवांचा काळ, ४ राशींना विशेष लाभ
फाल्गुन महिना आजपासून म्हणजेच २ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतोय आहे. हा आनंद आणि उत्सवाचा महिना आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि चंद्र देवाची विशेष प्रार्थना करणारे त्यांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होतात. फाल्गुनमध्ये होळी आणि महाशिवरात्री साजरी केली जाते.
आजच्या दिवशी कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी, अश्लेषा नक्षत्र आणि सौभाग्य योग यांचा प्रभाव आज जाणवणार आहे. चंद्र कर्क राशीत असल्यामुळे भावना तीव्र राहणार आहे. पण संयम ठेवून घेतलेले निर्णय आज लाभदायक ठरू शकतात. पाहूयात आजचं पंचांगं.
आजचं पंचांग
तिथी: कृष्ण प्रतिपदा
पक्ष: कृष्ण पक्ष
वार: सोमवार
नक्षत्र: अश्लेषा
योग: सौभाग्य
करण: बालव
चंद्र राशि: कर्क
ऋतु: शिशिर
सूर्य आणि चंद्र गणना
सूर्योदय: 07:07:11 AM
सूर्यास्त: 06:15:17 PM
चंद्रोदय: 06:48:35 PM
चंद्रास्त: 07:23:56 AM
हिंदू कालगणना
शक संवत: 1947
विक्रम संवत: 2082
मास (अमान्ता): माघ
मास (पुर्णिमान्ता): फाल्गुन
आजचे शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त:
12:19:00 PM ते 01:03:00 PM
आजचे अशुभ मुहूर्त
राहु काल: 08:30:42 AM ते 09:54:13 AM
यमघंट काल: 11:17:44 AM ते 12:41:15 PM
गुलिकाल: 02:04:45 PM ते 03:28:16 PM
आजचा दिवस कोणत्या चार राशींना देणार लाभ
कर्क रास
आज चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे आत्मविश्वास वाढलेला जाणवणार आहे. कुटुंबाशी संबंधित निर्णय योग्य दिशेने घेता येणार आहे. भावनिक बाबतीत स्थैर्य राखल्यास दिवस सकारात्मक ठरणार आहे.
वृषभ रास
आर्थिक बाबतीत आज संतुलन राहणार आहे. उत्पन्न आणि खर्च यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. संयमाने आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकालीन लाभ देऊ शकतात.
कन्या रास
कामातील बारकावे लक्षात येतील. नियोजन, अभ्यास किंवा लेखनाशी संबंधित कामात समाधान मिळणार आहे. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे.
मीन रास
आज नातेसंबंधात समजूतदारपणा वाढणार आहे. आध्यात्मिक किंवा सर्जनशील कामात मन रमणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

