Shani Jayanti: ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवारचा महासंयोग, या चुका टाळा नाहीतर शनिदेव होऊ शकतात नाराज

Shani Jayanti 2026: शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते उपाय केल्याने शनिदेवाची कृपा मिळू शकते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. साडेसाती आणि शनि दोष कमी करण्यासाठी खास धार्मिक उपाय येथे वाचा.
Shani Jayanti
Shani Jayanti Saam Tv
Published On

यावर्षी शनि जयंती शनिवार आज साजरी केली जाणार आहे. भगवान शनिदेवांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला होतो, असं मानलं जातं. या दिवशी योग्य विधींनी शनिदेवांची पूजा केल्यास त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, असा विश्वास आहे.

ज्यांच्या कुंडलीत शनिची साडेसाती किंवा ढैया आहे, किंवा ज्यांना शनिदेवाकडून शुभ फळं मिळत नाहीत. त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तथापि, कोणीही या दिवशी पूजा करू शकतो. कारण शनिदेवांना कर्माचे फळ देणारं आणि न्यायाची देवता मानले जाते.

Shani Jayanti
Budh Ast: 9 दिवसांत या राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; बुधाच्या अस्तामुळे येणार अच्छे दिन

शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात. असं मानलं जातं की, जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा आणि दान केलं तर शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमची दुःखं दूर होतात. या वर्षी शनि जयंती खूप विशेष मानली जातेय. कारण ती ज्येष्ठ अमावस्या आणि शनिवार या दिवशी येतेय. ज्योतिषांच्या मते, या दिवशी आपण काही चुका करण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

Shani Jayanti
Shukra Gochar: पुढच्या तीन दिवसात नशीब पालटणार; शुक्र नक्षत्राने घरात येणार पैसाच पैसा, व्यवसायात होणार प्रगती

पायाच्या बोटाला तेल लावा

अनेकदा शनिदेवांची पूजा करताना डोक्याला तेल लावलं जातं. ही एक गंभीर चूक आहे. शास्त्रानुसार, शनिदेवांच्या डोक्याला नव्हे तर पायाच्या बोटाला तेल लावलं पाहिजे.

शनी जयंतीच्या दिवशी काय करू नये

  • मांसाहार किंवा मद्यपान टाळा.

  • कोणत्याही गरीब, वृद्ध किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नका.

  • खोटेपणा, फसवणूक आणि चुकीच्या दूर राहा.

  • अनावश्यक भांडणं किंवा वादविवाद टाळा.

  • दान करताना खराब झालेल्या किंवा निरुपयोगी वस्तू देऊ नका.

  • उपासनेदरम्यान लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा.

Shani Jayanti
Shukra Gochar: शुक्राचं मिथुन राशीत होणार गोचर; 25 दिवस या ३ राशींच्या जीवनात येणार अडथळे

आजच्या दिवशी या गोष्टी करा आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवा

  • सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला.

  • जवळच्या शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

  • "ओम शान शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

  • शनिदेवाला काळ्या वस्तू अर्पण करा, जसे की काळे तीळ, काळे हरभरे आणि काळे कपडे.

  • गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या.

  • काळी छत्री, जोडे, मोहरीचं तेल आणि लोखंडी वस्तू दान करा.

  • शनि मंदिरात जाऊन सकाळी तसंच संध्याकाळी आरती करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com