horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv

Sunday Horoscope : मनासारखा दिवस जाणार; ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Sunday Horoscope : काही राशींच्या लोकांचा मनासारखा दिवस जाईल. काहींसाठी गेमचेंजर ठरणार आहे. वाचा रविवारचं राशीभविष्य
Published on

पचांग

रविवार,१६ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-द्वादशी २८|४८

रास-कन्या

नक्षत्र-हस्त

योग-प्रीतियोग

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - रोजचा दिवस सुखकर जावा असे प्रत्येकालाच वाटत असते. पण जीवनात अडचणी या ठरलेल्याच असतात. आज या अडचणींचा सामना तुम्हाला करावे लागेल. त्यात उष्णतेच्या विकारांनी त्रस्त असाल.

वृषभ - मनासारखे झाले तर कोणाला आवडणार नाही? आज आपण अनेक ठरवलेल्या गोष्टी तशाच होताना दिसतील. दिवस सुखाला नवीन झालर लावणार आहे. संततीकडून सुवार्ता मिळतील. विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळेल.

मिथुन - घरामध्ये पाहुण्यांची ऊठबस राहील. मुळातच नव्याने वस्तू खरेदी किंवा वाहन खरेदी यासाठी काहीतरी निमित्ताने कुटुंबीय आपण एकत्रित येणार आहात. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.

horoscope in marathi
Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

कर्क - बहिणीच्या सुखाने ओतप्रोत भरलेला आजचा दिवस असेल. काही वेळेला कारण नसताना मनाला अस्वस्थ वाटते. आज आपल्याकडून वेगळा पराक्रम याचमुळे घडेल.जवळच्या लोकांनी दिलेली शाब्बासकीची थाप नवा हुरूप वाढवेल.

सिंह - पैसे जरी जवळ असले तरी त्याचा योग्य विनियोग होणे हे गरजेचे असते.आज आपल्या राशीला पैसा मिळेल आणि नव्याने गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार राहाल. वारसा हक्काचा पैसा मधून आनंद वाटता येतील.

कन्या - मन फुलपाखरासारखे असेल. इकडे बागडावे तिकडे हुंदडावे असे वाटेल. बौद्धिक गोष्टींमध्ये विशेष रस निर्माण होईल. स्वतःवरच्या प्रेमाने तुम्ही तृप्त होऊन जाल. दिवस चांगला आहे.

horoscope in marathi
Lakshmi Photo Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात आणि ऑफिसमध्ये माता लक्ष्मीचा फोटो कुठे आणि कसा लावावा?

तूळ - बेजबाबदार पणाने कोणत्याही गोष्टी किंवा वक्तव्य आज करू नका. नाहीतर तुमचेच पाय तुमच्या गळ्यात अशी काही अवस्था होईल. खर्चाला मात्र संयम राखणे आज गरजेचे आहे. दिवस संमिश्र राहील.

वृश्चिक - शेजारी सहकार्य मिळेल. नव्या जुन्या परिचयामध्ये आपलं कोण परके कोण हे समजण्याचा आजचा दिवस आहे. परदेशी वार्तालाप होतील. जुन्या गोष्टी मधून आनंद शोधण्याचा आज प्रयत्न कराल.

धनु - समाजामध्ये एक वेगळी आपली प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा जाणार नाही असे वर्तन करणे गरजेचे आहे. आज सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेतल्यास विशेष सन्मान पदरी पडतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग आहेत.

horoscope in marathi
Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

मकर - लांबच्या प्रवासाला दिवस चांगला आहे. आपली चर असणारी रास. तीर्थक्षेत्री सहज भेटी होतील. शिव उपासना चांगली फलित देणारी ठरेल. काळजी नसावी. दिवस भाग्यकारक घटना घडविणार आहे.

कुंभ - मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जोडीदारा कडून मिळेल. विशेष सहकार्य जोडीदाराच्या कुटुंबीयांच्या कडून मिळेल. घवघवीत काहीतरी आपल्या नशिबी आज येणार आहे. काही वेळेला मनाने नाही तर बुद्धीने काम केल्यास फायद्याचे ठरते तो आजचा दिवस आहे.

मीन - संसारामध्ये गोडी गुलाबी ने काम कराल. याचा परिणाम असा होईल कामाच्या क्षेत्रात सुद्धा प्रगती साधाल. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल. सर्व बाजूंनी मनस्थिती चांगली राहणाऱ्या घटना आज घडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com