Sunday Horoscope : बैठ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, शेतीवाडीचे कामे मार्गी लागतील; ५ राशींच्या लोकांना उत्तम धनयोग

Sunday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांचं बैठ्या घराचे स्वप्न पूर्ण होईल. तर काहींचं शेतीचे प्रश्न मार्गी लागतील.
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

रविवार,१० ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष.

तिथी-प्रतिपदा १२|११

रास-कुंभ

नक्षत्र- धनिष्ठा

योग-शोभन

करण-कौलव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - आपलेच लोक आपल्या कामाला येतात हे यात जाणवेल आणि अनेक दिवस अडकून राहिलेल्या गोष्टींचे आज लाभ होतील. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने कामे पूर्ण होतील. दिवस चांगला आहे.

वृषभ - सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हाल. राजकारणामध्ये उत्तम सल्ला आज आपण एखाद्याला देऊ शकाल.कामाबरोबरच मनोरंजन क्षेत्रांमध्ये सुद्धा भरारी घेण्याचे योग आहेत.

मिथुन- विष्णू उपासना आज चांगली ठरणार आहे. महत्त्वाच्या बैठका पार पडतील. चांगल्या वार्ता कानावर येतील. लांबचे प्रवास घडतील कदाचित तीर्थक्षेत्रि जाण्याचे योग आहेत.

horoscope in marathi
Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

कर्क - ठरवून अडचणी कोणी उत्पन्न करत नसतो. पण आलेल्या गोष्टी भोगाव्या लागतात. आज अचानक उद्भवणाऱ्या अडचणींवर एकट्याने मात करावी लागेल. आपले मनोबल उत्तम ठेवणे गरजेचे आहे.

सिंह - जोडीदाराला समजून घेताना आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मनाला मुरड घालून दिवस कंठावा लागेल. पण एकमेकांविषयीचे प्रेम आपल्याला आयुष्याची नवी स्वप्ने रंगवण्यासाठी आज भक्कम आधार वाटेल.

कन्या - पोटाच्या तक्रारींनी सध्या त्रस्त आहात. आज सुद्धा काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळावे. योग्य आहार योग ध्यानधारणा याच्यामुळे मनस्थिती, शरीर स्वस्थ दोन्हीही उत्तम राहील. नोकरीत प्रगती आहे.

horoscope in marathi
Office Vastu Tips: ऑफिसच्या टेबलावर या वस्तू कधीही ठेवू नका, करिअर आणि आरोग्यासाठी त्रासदायक

तूळ - संतती मधील कला गुण बहरतील.एखाद्या गोष्टीने प्रेरित होऊन जाल. स्वतः मधील सृजनशीलता वाढेल. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये अग्रेसर असाल. धनयोग उत्तम आहेत.

वृश्चिक - बैठ्या घराचे स्वप्न असेल तर आज पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकाल. शेतीवाडीच्या कामांमध्ये यश मिळणार आहे. असा काहीसा दिवस आज असेल.

धनु - आपली रास धाडसी आणि साहसी आहे. आज त्याच्यामध्ये अधिक भर पडेल. एखाद्या उद्देशाने पेटून उठाल आणि जिद्दीने ते पूर्णही पाडाल. पराक्रमात भर पडेल. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

horoscope in marathi
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार बाथरुममध्ये मीठ ठेवल्याने 'हे' दोष दूर होतात, वाचा फायदे आणि उपाय

मकर - नवी ऊर्जा घेऊन आज कामे करावी लागतील. घरी पाहुण्यांची उठबस असेल. स्नेहभोजनाचे योग येतील. जुन्या आठवणींमध्ये रमताना एक वेगळा आनंद होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - आपण आपल्याला एक वेगळ्या प्रकारे गवसाल. आपली उर्मी, जिद्द, ताकद दाट होईल. स्वतःलाच प्रेमाने गोंजाराल . इतरांना आपल्या प्रभावामुळे आश्चर्यचकित कराल. दिवस चांगला आहे.

मीन - नको असलेल्या गोष्टी आज अंगलट येतील. यातून पळवाट काढावी की काय असं वाटेल. पण परिस्थितीशी दोन हात करा. गोष्टी अशाच राहणार नाहीत मनोबल जपण्यासाठी अध्यात्मिक बैठक योग्य ठरेल. खर्च अफाट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com