Monday Horoscope : अचानक धावपळ वाढेल, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Monday Horoscope in Marathi : तुमची अचानक धावपळ वाढण्याची शक्यता आहे. तर काहींना वादापासून दूर राहवे लागेल. वाचा सोमवारचं राशीभविष्य
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : तुम्हाला कार्यालय आणि व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा लागेल. नवीन कामे मिळवताना दगदग होण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात धावपळ करावी लागेल.

वृषभ : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे आखावी लागतील. कामाची योग्य आखणी करावी लागेल. तरुणांनी चुकीची संगत सोडावी लागेल.

मिथुन : पैशाची थोडी चणचण भासण्याची शक्यता आहे. जोडधंद्यातून चांगली कमाई होईल. तुमचा कामानिमित्त प्रवास होईल.

TODAY HOROSCOPE in Marathi
Sunday Horoscope : अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

कर्क : तुमच्या व्यवसायात उलाढाल होण्याची शक्यता आहे. नोकरीत भत्ते मिळाल्याने खूश व्हाल. तुमचा स्वभाव प्रगतीसाठी उपयोगी ठरेल.

सिंह : तुम्हाला अनेक कामांत यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मानसन्मान वाढेल. कामानिमित्त लांबचा प्रवास घडेल. महिलांची प्रकृतीबाबत चिंता कमी होईल.

कन्या : नोकरी, व्यवसायाआधी केलेल्या कष्टायचे चीज होईल. अनुभव उपयोगात येईल. महिल वर्गाचे आरोग्य चांगले राहील.

तूळ : महत्वाचे काम पूर्ण होतील. तुमची आर्थिक प्रगती उत्तम राहील. तुमची अचानक धावपळ वाढेल. आर्थिक व्यवहाराबाबत बेफिकीर राहणे टाळावे.

वृश्चिक : व्यवसायात लाभ मिळेल. तुमची रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. वादग्रस्त प्रकरणापासून चार हात लांब राहणे फायदेशीर ठरेल. महिलांना वैवाहिक सुख लाभेल.

धनू : आर्थिक चिंता मिटेल. कनिष्ठ नोकरदारांना वरिष्ठांच्या मर्जीत राहावे लागेल. घरगुती कार्यक्रमाची योजना आखावी लागेल.

TODAY HOROSCOPE in Marathi
अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

मकर : नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : नवीन कामांना गती मिळेल. तरुणींनी नोकरीत सुसंवाद साधून कामे करून घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.

मीन : उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागेल. व्यवसायात नियमांचे पालन करावे लागतील. दिवसभरात दगदग करू नका.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखाच्या आधारे निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com