

मेष : आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला जाईल. करिअर आणि व्यापाऱ्यांसाठी दिवस लाभदायक ठरेल. जुन्या मित्रांचं सहकार्य लाभेल.
वृषभ : कायदेशीर कामे पूर्ण होतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ सहकाऱ्यांचं मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी आहे.
मिथुन : ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं जोरदार कौतुक होईल. अनुभवी लोकांचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहण्याचे संकेत दिसत आहेत.
कर्क : दिवसभरात घाईघाईत निर्णय घेऊ नये. महत्त्वपूर्ण निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कुटुंब मदतीला धावून येतील.
सिंह : व्यावसायिक क्षेत्रात भरभराट होईल. तुम्हीला केलेल्या कष्टाचं चीज होईल. तुम्ही टीममध्ये महत्वाची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.
कन्या : आज दिवसभरात कामाची प्राथमिकता ठरवणे फायदेशीर ठरेल. कामात निष्काळजीपणा करणे नुकसानदायक ठरेल.
तुला : मित्र आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत मिळेल. मनोरंजनासाठी सिनेमा पाहायला जाण्याची संधी मिळेल. समाजात आदर वाढेल.
वृश्चिक : आज घरगुती वादापासून दूर राहावे लागेल. नातेवाईकांमध्ये वेळ घालवण्यासाठी संधी मिळेल. तुमच्या ओळखीचे लोक मदतीला येतील.
धनु : आज आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना लाभ होईल. भाऊ-बहीण आणि जवळच्या लोकांमध्ये नातं आणखी चांगलं होईल.
मकर : घरात महत्त्वाच्या व्यक्तीची घरात आगमन होईल. यश मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबात उत्साहाचं वातावरण राहील.
कुंभ : तुम्ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. मित्रांसोबत फिरायला जाण्याची संधी आहे. व्यवहार योग्यप्रकारे हाताळाल.
मीन : आर्थिकबाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. करिअर आणि व्यापारात नफा मिळण्याचे संकेत दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.