Shani-Surya Grahan Yog: मार्चमध्ये शनी-सूर्याची होणार अद्भुत युती; 'या' राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत

Shani Gochar Surya Grahan Yog Prediction: ग्रह आणि ताऱ्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत संयोगांचा परिणाम प्रत्येक मानवाच्या जीवनावर दिसून येतो. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे.
Surya Grahan 2025 and Shani Gochar
Surya Grahan 2025 and Shani Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीत दोन ग्रह आल्यामुळे त्यांची युती निर्माण होते. अशावेळी ग्रह आणि ताऱ्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत संयोगांचा परिणाम प्रत्येक मानवाच्या जीवनावर दिसून येतो.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे. यासोबतच या दिवशी सूर्यग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे या काळात सूर्य आणि शनीचा एक अद्भुत संयोग तयार होणार आहे. सूर्य आणि शनीच्या युतीमुळे कोणत्या राशींना विशेष फायदा होणार आहे ते जाणून घेऊया.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
लक्ष्मी घरी येण्यापूर्वी देते 'हे' संकेत; पाहा तुम्हाला दिसतात का?

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना शनीचं गोचर आणि सूर्यग्रहणाच्या अद्भुत संयोगामुळे विशेष लाभ होणार आहे. या काळात अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळू शकणार आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Todays Horoscope: आजच्या दिवशी 'या' राशींनी सावधगिरीने पावले उचलावी; पाहा तुमचं भविष्य

धनु रास

शनीच्या गोचर आणि सूर्यग्रहणाच्या युतीमुळे धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसाय वाढेल आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळू शकणार आहे.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Grah Gochar: बुध-शनी-सूर्याच्या युतीने या राशींच्या आर्थिक प्रगतीला लागणार गती, पैशांची चिंता मिटणार!

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर आणि सूर्यग्रहण यांचा संयोग देखील शुभ मानला जातो. सूर्य आणि शनीच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक जीवनात प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामात आनंद मिळणार आहे. सुख आणि समृद्धीचे साधन वाढू शकणार आहे. नातेसंबंध अधिक दृढ होणार आहेत.

Surya Grahan 2025 and Shani Gochar
Shani Gochar: मार्चमध्ये शनीचा डबल अटॅक, 2 वेळा बदलणार चाल; 'या' राशींना लागणार जॅकपॉट

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com