Surabhi Jayashree Jagdish
खूपदा आपल्या मनात एक असते आणि वर्तन एक केलं जाते. आज कुटुंबामध्ये बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.
राशीचे गुण जात नाहीत. आज हे दोन्ही गुण बहरतील एकूणच जगण्याविषयी सकारात्मकता येईल.
सहजगत्या अडचणीतून वाट सुद्धा काढता येते आज समजेल. विनाकारण नको त्या गोष्टीत अडकणार नाही याची काळजी घ्या.
आपल्या स्वभावामुळे अनेक लोक आपोआप जोडले जातात. असंच नवीन परिचय होतील जे कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतील.
आपल्याच ऐटीत आणि तोऱ्यात रहायला आपल्याला आवडते. उलट आपल्याच आधारामुळे इतर लोकांची प्रगती होईल.
खूपदा अति चिकित्सकपणा आपल्या अंगलट येतो. काही वेळेला बुद्धीपेक्षा मनाने काम करा.
पैशाशिवाय जगणं आपल्याला नकोसं वाटतं. पण याच्या अति आहारी जाऊ नका. सावधगिरीने पावले उचला.
एकाच वेळी अनेक कामे करण्याची आपल्यात कपॅसिटी असते. व्यवसायातील भागीदार आणि जीवनातील जोडीदार या दोघांचा उत्तम सहकाऱ्यांनी पुढे जाल.
रास गुरूची असली तरी कधी तिरसटपणा आपल्या अंगलट येतो. आपले दुर्गुण उघडे करणारे लोकही बरेच आहेत.
पुढील गोष्टींचे उत्तम नियोजन आणि आयोजन आपल्याकडून सहज होते. आज शिव उपासना फलदायी ठरेल.
सातत्याने नवीन संशोधन नव्याच्या शोधात राहायला तुम्हाला आवडतं. आज नवीन ओळखी आणि परिचय यामधून नव्या व्यवसायाच्या वाटा तयार होतील.
देवभोळेपणा आणि साधेपणा हा आपला दुर्गुण नाही तर आपली हीच सात्विकता आज आपल्या कामी येईल. जवळच्या लोकांकडून वाहवा होईल.