Surabhi Jayashree Jagdish
असं मानलं जातं की, माता लक्ष्मीचा स्वभाव खूप चंचल आहे, म्हणूनच ती एका ठिकाणी थांबत नाही.
कदाचित यामुळेच लोकांना कधीकधी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. पण काही लोक असे असतात ज्यांच्यावर लक्ष्मीची नेहमी कृपा असते.
आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत जी माता लक्ष्मी येण्याआधी व्यक्तीला देत असते.
जर तुम्हाला सकाळी रस्त्यावर कुठेतरी घुबड दिसलं तर समजून घ्या की कुठून तरी तुमच्याकडे पैसा येणार आहे.
जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर शंख ऐकला तर समजा तुमचे नशीब जागृत होणार आहे.
तुम्हाला पहाटे कोणी फरशी झाडताना दिसलं तर समजून घ्या की आर्थिक लाभ तुमच्या नशिबात आहे.
तुम्हाला कुठेतरी मोर दिसला तर विश्वास ठेवा की, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे.