Shani Ast: पैसाच पैसा! होळीपूर्वी शनी ग्रह होणार अस्त; 'या' ३ राशी होणार मालामाल, मिळू शकणार बक्कळ पैसा

Saturn Planet Set In Kumbh: शनी एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतात. त्यामुळे शनी जेव्हा त्याच्या राशीत बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.
Shani Ast
Shani Astsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशी भ्रमण करतात त्याला गोचर असं म्हटलं जातं. एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये हा बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी देव. शनी एका राशीमध्ये सुमारे अडीच वर्ष राहतात. त्यामुळे शनी जेव्हा त्याच्या राशीत बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

शनी जातकाला त्याच्या धर्माच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतो. असं म्हणतात की, शनिदेवाच्या कृपेने रांक राजाही होतो. शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह असून तो सुमारे अडीच वर्षे एका राशीत राहतो. त्यामुळे याला एक राशीचक्र पूर्ण होण्यास सुमारे ३० वर्षे लागतात. त्याचे सात शनी वेळोवेळी आपले स्थान बदलतात. त्याचप्रमाणे होळीपूर्वी २८ फेब्रुवारीला शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. अशावेळी काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Shani Ast
Chandra Grahan 2025: 14 मार्चपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ; पैशांच्या नुकसानीसह आरोग्यही बिघडणार

मेष रास

या राशीच्या अकराव्या भावात शनी अस्त होणार आहे. अशावेळी या राशीच्या लोकांकडून होत असलेल्या प्रयत्नांतून त्यांना भरपूर यश मिळू शकणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाले तर या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. यासोबतच तुम्ही अनेक प्रवास करू शकता.

Shani Ast
Navpancham Rajyog: शनी-मंगळ बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा, प्रत्येक कामात यश

कर्क रास

या राशीच्या आठव्या भावात शनी अस्त होणार आहे. अनपेक्षित धनलाभासह वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होणार आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही बनवलेल्या स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही भविष्यात भरपूर नफा कमावू शकता.

Shani Ast
Mangal Gochar: मंगळ 'या' राशींचं जीवन करणार अमंगल; शनीच्या नक्षत्रात प्रवेश केल्याने येणार भूकंप, राहा सावधान

धनु रास

या राशीमध्ये शनी तिसऱ्या भावात अस्त होणार आहे. अशा स्थितीत या राशीसाठी शनीची स्थिती अनुकूल ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांचा आपल्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ जाणार आहे. तुमचं काम पाहून तुम्हाला बोनस मिळू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे. उत्पन्न झपाट्याने वाढू शकणार आहे. प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळू शकतं.

Shani Ast
Shurka Uday: धनदाता शुक्राच्या उदयामुळे बनणार पंच महापुरुष राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com