
शनिवार,५ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष,
पुनर्वसु रवि.
तिथी-दशमी १८|५९
रास-तुला
नक्षत्र-स्वाती
योग-सिद्ध योग
करण-गरज
दिनविशेष-२० प.चांगला
मेष - व्यवसायाच्या बाबतीत नव्याने काही गोष्टी घडतील. भागीदाराला समजून घेतल्यास वृद्धीचे योग दिसत आहेत. अनेक दिवस रखडलेली कोर्टाची कामे आज यशस्वी होतील.
वृषभ - विनाकारण कोणाशी वाद घालून शत्रुत्व घेऊ नका. अनेक दिवस किंवा जुने असणारे शत्रुत्व नव्याने तयार होईल. आज प्रेम मात्र वृद्धिंगत होईल.
मिथुन - आपली रास म्हणजे "जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन" अशी आहे. अनेक गोष्टी एकत्रितरित्या केल्यामुळे काय करावे आणि काय करू नये असा संभ्रम आज राहील. पण त्यातही एक वेगळी सृजनशीलता सांभाळून कामे कराल. विष्णू उपासना करावी.
कर्क - घरामध्ये वातावरण आनंदी आणि चांगले राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. आईचे प्रेम मिळेल. एखादे धार्मिक कार्य घरामध्ये होण्याची शक्यता आहे.
सिंह - "प्रेमाला उपमा नाही" असा दिवस आहे. केलेल्या कामामधून, प्रेमामधून त्याची योग्य पावती आज मिळेल. जवळच्या प्रवासातून फायदा होईल. दिवस संमिश्र आहे.
कन्या - बौद्धिक क्षमता चांगली असणारी आपली रास आहे. काही वेळेला सहजगत्या दुसऱ्याची मदत करायला जाता पण आपण अडकता. असे अनुभव येतात. आज व्यावहारिक गोष्टी काळजीपूर्वक जपा. कुठेही साक्षीदार राहू नका.
तुळ- मनोरंजन क्षेत्रात विशेष भरारी घ्याल. मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी अट्टाहास कराल. दिवसाचा आनंद लुटण्यासाठी विशेष प्रयत्न करा. जवळच्या लोकांना आपलेसे करून मर्जी जिंकाल.
वृश्चिक - वेगळे धाडस आणि साहस घेऊन पुढे जायला लागेल. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणे आज गरजेचे आहे. मनोबल कमी राहील. पण यातून मार्ग नक्की काढाल असे दिसते आहे.
धनु - मोठी स्वप्न, आशा, आकांक्षा बघणं काही चुकीचे नाही. जुन्या केलेल्या गोष्टीतून जुन्या पाहिलेल्या स्वप्नातून आज अशा स्वप्नवत गोष्टी पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या परिचित लोकांच्या सहकार्याने पुढे जाल.
मकर - कष्टासाठी मागेपुढे न पाहणारी आपली रास आहे. काही वेळेला "घरचे झाले थोडे" हे माहीत असून सुद्धा तुम्ही सामाजिक कार्यात सुद्धा तेवढाच सहभाग घेता. आज मात्र यातून तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल.
कुंभ -जेवढे विचार कराल तेवढी आपली रास खोलात जाणारी आहे. काही वेळेला देवावर विश्वास ठेवून शरणागती पत्करली तर योग्य दिशा सापडेल. आज खूप खोलवर विचार न करता श्रद्धेने शिव उपासना करा. त्याचे द्विगुणीत फळ आज आपल्याला मिळेल.
मीन - जोडीदार आणि आपले यांचे आज विचार जुळतील. एकमेकांमुळे धनलाभाचे योग आहेत. मात्र कामात खोडा येण्याची शक्यता आहे तितकीच दिसत आहे. सचोटीने कामे केल्यास मार्गी लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.