Samsaptak Drishti Yog: 'या' तीन राशींच्या जातकांच्या जीवनात येणार 'अच्छे दिन'; यशासह मिळेल पैसा अन् प्रसिद्धी

Astrology Prediction : सूर्य आणि गुरु समसप्तक योग तयार करणार आहे. १२ राशींपैकी ३ राशींच्या जातकांना अच्छे दिन येणार आहेत. याकाळात संपत्ती, यश आणि आनंदाच्या नवीन संधी निर्माण होतील.
Mahabhagya Yoga astrology
Astrological chart showing Sun and Jupiter alignment forming Samsaptak Drishti Yog.saam tv
Published On
Summary
  • सूर्य आणि गुरु ग्रहांमुळे समसप्तक दृष्टि योग निर्माण

  • १२ पैकी ३ राशींना अच्छे दिन सुरू होण्याचे संकेत

  • पैसा, यश आणि प्रसिद्धीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

सूर्य आणि गुरु ग्रहाचा प्रतियुती दृष्टी योग, ज्याला समसप्तक योग असेही म्हणतात. या योगाला ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या राशीवर नजर टाकतो तेव्हा प्रतियुती दृष्टी येते आणि दोघांमध्ये ७ व्या भाव संबंध निर्माण होतो. ७ भावात असताना जर ग्रहाची नजर पडली तर ऊर्जा संतुलित आणि लाभकारी होत असते.

वैदिक पंचांगानुसार ९ जानेवारी २०२६ पासून सूर्य आणि गुरू हा योग निर्माण करतील. सूर्याची शक्ती आणि गुरु ग्रहाची आशीर्वादित ऊर्जा एकत्रितपणे सकारात्मक परिणाम निर्माण करतील. याचा राशींना फायदा होईल. सूर्य-गुरु प्रतियुती दृष्टी योग तीन राशींच्या जातकांना मोठे भाग्य मिळवून देऊ शकतो.

मिथुन

या राशींसाठी या योगाचा काळ खूप लाभदायक असणार आहे. सूर्य आणि गुरु ग्रहाचा एकमेकांशी विरोध तुमच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात नवीन उंची आणेल. तसेच उत्पन्न वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याचे संकेत आहेत. मानसीक स्थैर्य निर्माण होईल. कुटुंबात सूख-शांतीचे वातावरण असेल. मित्रांची मदत मिळेल. तुमच्या वाट्याला नवीन संधी येतील, ज्यामुळे भविष्य सुरक्षित आणि समृद्ध दिसेल

Mahabhagya Yoga astrology
Horoscope: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन राशींना लागणार लॉटरी, प्रगतीसह घरात येणार पैसाच पैसा

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग यश आणि प्रतिष्ठा देईल. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. सूर्याची ऊर्जा त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. गुरु ग्रहाच्या आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनात स्थिरता आणि संतुलन येईल. धनलाभ होईल. त्यांचे आरोग्य सुद्दा चांगले राहिल. अभ्यास आणि शिक्षणात यश मिळण्याच्या संधी देखील उपलब्ध होतील.

Mahabhagya Yoga astrology
Sunday Horoscope : लाईफ पार्टनरशी वाद-विवाद होण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

धनु

९ जानेवारी २०२६ पासूनचा काळ धनु राशीसाठी खूप फलदायी राहणार आहे. सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उत्पन्न वाढण्याची आणि संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होणार. प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता वाढेल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते दृढ होईल आणि तुम्हाला जीवनात संतुलन आणि आनंद अनुभवायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com