Sunday Horoscope : प्रेमसंबंध सुधारतील, आर्थिक लाभ होईल; कर्कसह ५ राशींच्या लोकांसाठी रविवार गेमचेंजर ठरणार

Sunday Horoscope in Marathi : तुमचे प्रेमसंबंध सुधारण्याची शक्यता आहे. तर काहींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
Tuesday Horoscope in Marathi
Horoscope in MarathiSaam tv
Published On

मेष : नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ : कार्यालयात मान, दर्जा आणि प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत दिसताहेत. घर खरेदी करण्यासाठी अनुकूल संधी निर्माण होत आहेत.

मिथुन : तुमच्या पार्टनरसोबतचे नाते सुधारण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी अनुकूल दिवस आहे.

Tuesday Horoscope in Marathi
Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

कर्क : तुमच्या नोकरीतील कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल. आर्थिक लाभ मिळेल.

सिंह : एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्याल. पार्टनरसोबत तुमचे नाते अधिक चांगले असेल.

कन्या : पार्टनरशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

तूळ : करिअरच्या निर्णयाबाबत कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी लागेल.

वृश्चिक : कार्यालयात केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना फळ मिळेल. वरिष्ठांशी अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण होतील.

धनु : मानसिक ताण किंवा चिंतांचा सामना करावा लागेल. जुनाट आजारांपासून दिलासा मिळेल.

Tuesday Horoscope in Marathi
Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

मकर : नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. अचानक धनलाभ होईल.

कुंभ : मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अनुकूल संधी निर्माण होईल. पालक आणि जोडीदार यांच्याशी संबंध अधिक दृढ होतील.

मीन : आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल.

टीप - राशीभविष्य केवळ ज्योतिषीय अंदाजावर आधारित आहे. तुमच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com