Horoscope Today : आज प्रेमाने जग जिंकाल; तर काहींनी 'या' लोकांपासून राहा सावध, तुमची रास कोणती?

Horoscope Today in marathi : आज काही लोक प्रेमाने जग जिंकतील. तर काहींनी या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या नशीबात आज काय लिहिलंय? वाचा
Rashi Bhavishya
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

सोमवार,२७ जानेवारी २०२५,पौष कृष्णपक्ष,सोमप्रदोष, शिवरात्रि.

तिथी- त्रयोदशी २०|३५

रास- धनु

नक्षत्र- मूळ

योग- हर्षण

करण-गरज

दिनविशेष- त्रयोदशी वर्ज्य

Rashi Bhavishya
Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजासाठी करा 'या' शुभ रंगांची निवड

मेष - द्रुतगती प्रवास होतील. वाहनांवर चांगली वेगवान मांड राहील. वर्तन मानसिकता आणि कृती यामध्ये योग्य समन्वय आज साधणे गरजेचे आहे. सोमप्रदोष आहे. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल.

वृषभ - गुढ गोष्टींविषयी आकर्षण वाढेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. कामाचा डोंगर वाढता असेल. योग्य वेळी योग्य मार्ग मात्र नक्की काढा.

मिथुन - संभाषणामधून अवघड गोष्टी सुकर होतील. कोर्टामध्ये आपली यशस्विता पक्की आहे. नको असलेल्या लोकांपासून सावध राहण्याचा इशारा आहे

Rashi Bhavishya
Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजासाठी करा 'या' शुभ रंगांची निवड

कर्क - भावनेच्या भरात चुकीचे निर्णय आज घेऊ नका. कदाचित नात्यांच्या बाबतीत अति वाहवत जाण्याचा आजचा दिवस आहे. हितशत्रू त्रास देतील. खराब पाण्यापासून होणारे तब्येतीच्या तक्रारी याबाबत सावधगिरी बाळगा.

सिंह - सोमप्रदोष आहे शिव उपासनेचा विशेष पगडा राहील आणि त्याचा फायदा आपल्याला मिळेल. शेअर्स आणि लॉटरी मध्ये धनलाभ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगल्या संधी आणि सुवार्ता घेऊन आलेला आहे.

कन्या - "ऐलतीर पैलतीर" अशी आजची आपली स्थिती असेल. कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे त्याचबरोबर कामावरही लक्ष केंद्रित करायचे. आपले कार्यक्षेत्र आपल्याला वेगळ्या दिशेने खुणावेल. पण दोन्हीचा ताळमेळ घालता यायला हवा.

Rashi Bhavishya
Vastu Tip: घरात तुळशीचे रोप कोणत्या दिशेला असावे?

तूळ - प्रकाशन, लेखन क्षेत्रामध्ये प्रगती साधाल. कवी व्यक्तींसाठी नवीन काव्य स्फुरेल. भावंड सौख्य उत्तम राहील. छोट्या प्रवासातून फायदा आहे.

वृश्चिक- नवीन नाती जोडण्याच्या प्रयत्नात राहाल. प्रेमाने जग जिंकाल. तिखट, मसालेदार खाद्यपदार्थ खाण्याची आज लहर येईल. पैशाची आवक जावक चांगली राहील.

धनु - घोड्यासारखे उमदे आपले व्यक्तिमत्व आहे. ते अजूनच आकर्षक दिसून येईल. दिवस सातत्याने कामामध्ये मग्न राहण्यात जाईल. सकारात्मकता वाढेल.

Rashi Bhavishya
Vastu Tips: संध्याकाळी झाडाची फुलं आणि पानं का तोडू नये? कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

मकर - तब्येतीची काळजी घ्यावी. हॉस्पिटल वा तत्सम गोष्टीत विनाकारण पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. दूरचे प्रवास घडतील.

कुंभ - परदेशातील मित्रांशी संपर्क साधाल. व्यवसायाच्या दृष्टीने मोठे बेत आखले जातील. जुन्या केलेल्या गोष्टींचा योग्य परतावा मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मीन - समाजकारणामध्ये काहीतरी करावं अशी भावना येईल. समाजासाठी आपण देणं लागतो ही जाणीव होईल. त्या दृष्टीने पावले उचलाल हाच आयुष्यातला एक योग्य टर्निंग पॉईंट असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com