
बुधवार,१८ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,
संकष्ट चतुर्थी.
तिथी- तृतीया १०|०७
रास- कर्क
नक्षत्र-पुष्य
योग-ऐंद्रयोग
करण- बवकरण
दिनविशेष-१० नं. चांगला
मेष - अनेक लाभ पदरात पडण्याचा आजचा दिवस आहे.मनासारख्या गोष्टी घडल्यामुळे पुढील काम करण्यास आज हुरुप येईल. नातेवाईकांच्याकडून योग्य ती मदत आणि सहकार्य मिळेल.
वृषभ - तब्येतीच्या तक्रारी वाढत्या राहतील. कदाचित रुग्णालयासाठी खर्च येईल. डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवा त्यामुळे अडचणी कमी होतील. मनस्थिती सांभाळा.
मिथुन - सकारात्मकता वाढीला लागेल. ठरलेल्या गोष्टी सुनियोजित वेळेत झाल्यामुळे दिवस सार्थकी लागेल. व्यवसाय वृद्धीसाठी आज सुवर्णसंधी असेल.
कर्क- पैशाची आवक चांगली राहील. घरातील वरिष्ठ लोकांच्याकडून आपल्याला शाबासकीची थाप मिळेल. कुटुंबीयांसाठी झोकून देऊन काम कराल.
सिंह - छोट्या प्रवासात आज फायदा होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार मार्गी लागणार आहेत. जोडीदारापासून भाग्योदय संभावतो आहे. आपली उदारता आणि सढळता यामुळे समाजात वाहवा होईल.
कन्या - शेतीच्या कामामध्ये फायदा आहे. बागायतीची कामे मार्गे लागतील. घराचे व्यवस्था यांत पैसा खर्च करावा लागेल. इतरांना जपत, तोल सांभाळत दिवस यशाच्या शिखरावर राहील.
तूळ - देवी उपासना फलदायी ठरेल. सत्कर्मा मध्ये वाढ होईल. स्वतःचा आत्मविश्वास द्विगुणीत होईल. इतरांच्या फायद्यासाठी त्याचा वापर कराल. क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे.
वृश्चिक - चोर आणि चोरी पासून सावधगिरीचा आज इशारा आहे. ठरलेल्या गोष्टी वेळेत घडतात. आज घाई नको. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल.
धनु - जोडीदाराच्या विचित्र निर्णयामुळे जीव मेताकुटीला येईल. त्यामुळे व्यवसायामध्ये सुद्धा मन रमणार नाही. द्विधा मनस्थिती टाळून अडचणींवर मात करा. असे दिवस सांगतो आहे.
मकर - शारीरिक मेहनत आणि कष्ट याचा आलेख आज वाढता राहील. अंतर्मुख व्हावे असेही वाटेल. चुकीच्या गोष्टीत अडकलात तर त्याचे बुमरांग तुमच्याकडे येईल हे लक्षात ठेवा.
कुंभ - शिव उपासना करावी. श्रेयस आणि प्रेयस यातील फरक ओळखा आणि पुढे चला. भाग्याने चांगल्या गोष्टी पदरात दिलेल्या आहेत त्याकडे सकारात्मकतेने पहा.
मीन - व्यवसाय वृद्धी आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्यामध्ये लपलेल्या कामाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आज बाहेर येईल. सहकाऱ्यांची योग्य साथ मिळाल्याने दिवस सुखाचा जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.