Rashi Bhavishya : या राशींच्या लोकांनी आज मौल्यवान वस्तू सांभाळा, उगाच धाडस करणे टाळा; वाचा राशी भविष्य

Horoscope Today 29 June 2024 : आज काही राशीच्या लोकांच्या मौल्यवान वस्तू गहाळ होऊ शकतात. विनाकारण कोणत्याही कामात धाडस करणे टाळावे, वाचा आजचे राशी भविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya Today 29th June 2024Saam TV

दैनिक पंचांग - शनिवार दिनांक २९ जून २०२४.

तिथी - ज्येष्ठ कृष्ण अष्टमी. नक्षत्र - उत्तराभाद्रपदा. योग - शोभन. करण - कौलव. रास - मीन. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : त्रास कटकटी होतील

प्रवासामध्ये त्रास कटकटी होतील. अध्यात्माकडे कल ठेवल्यास मानसिक कौल आणि डामडौल चांगला राहील.

वृषभ नवीन परिचय होतील

महत्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन परिचय होतील. तुमच्या ओळखीने इतरांची कामे होतील. तुम्हालाही त्यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : कीर्ती आणि संपदा मिळेल

तुमचे कार्यक्षेत्र बहरणार आहे. कामानिमित्त प्रवास होतील. कीर्ती आणि संपदा मिळण्याचा दिवस आहे.

कर्क : दत्तगुरूंची साथ मिळेल

गुरुकृपा लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. अध्यात्मिक आणि धार्मिक कौल आज वाढेल. दत्तगुरूंची विशेष साथ मिळेल.

सिंह : विनाकारण कटकटी होतील

"काटा रुते कुणाला" असा दिवस आहे. विनाकारण त्रास कटकटी होतील. भाग्य साथ देणार नाही. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : नवीन मार्ग मिळतील

नवी दिशा नवीन मार्ग मिळतील. मन आनंदी आशावादी राहील. कामाचा व्याप वाढेल. तोच आनंद असेल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Vrishchik Rashi Career: वृश्चिक राशीचे लोक असतात खूपच हट्टी, फक्त त्यांना नडतात 'या' गोष्टी; जाणून घ्या राशीबद्दल...

तूळ : मोठे धाडस करू नका

आर्थिक क्षेत्रात धाडस मोठे घेऊ नका. मानसिक अस्वस्थता जाणवेल त्याच्यावर मात करा. शत्रू त्रास देतील.

वृश्चिक : उपासना कामी येईल.

नवीन दिशा नवीन मार्ग सापडणार आहेत. मन आनंदी आशावादी राहील. केलेली उपासना कामी येईल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल

आपल्या वस्तू जपा. काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विनाकारण काही त्रास कटकटी डोकेवर काढतील.

मकर : छोटे प्रवास घडतील

शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती होईल. व्यवहार पूर्ण होतील. छोटे प्रवास घडतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ : लक्ष्मी प्राप्तीचा योग

जागेचे प्रश्न आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्याही कमी होतील. व्यवहार पार पडतील दिवस चांगला. लक्ष्मी प्राप्ती योग आहेत.

मीन : दिवस लाभाचा आहे

एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल आणि ते तुम्ही जिद्दीने पार पाडाल. उत्तमोत्तम गोष्टी करण्यासाठी दिवस लाभ घेऊन आला आहे.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya : नकारात्मक विचार बाजूला ठेवा, चांगल्या पथावर चला; जाणून घ्या तुमचं आजचं राशी भविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com