Rashi Bhavishya : नकारात्मक विचार बाजूला ठेवा, चांगल्या पथावर चला; जाणून घ्या तुमचं आजचं राशी भविष्य

Horoscope Today 28 June 2024 : आज काही राशींच्या लोकांच्या विचार नकारात्मक विचार येतील. ते बाजूला ठेवा. चांगल्या पथावर चालल्याने फायदा होईल, वाचा आजचे राशी भविष्य...
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya Today 28th June 2024Saam TV

दैनिक पंचांग - २८ जून २०२४

वार - शुक्रवार. तिथी - ज्येष्ठ कृष्ण सप्तमी. नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा. योग - सौभाग्य. करण - बव. रास - मीन. कालाष्टमी. दिनविशेष - उत्तम दिवस.

मेष : "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" असा आजचा दिवस आहे. विनाकारण एकटेपणाची जाणीव मनामध्ये येईल. नकारात्मक विचार येतील. स्वतःला यातून बाजूला ठेवा.

वृषभ : "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे". स्वतःची सत्कृत्ये यांचे फलित आपल्याला आज मिळणार आहे. इतरांना आपल्याबरोबर घेऊन जाल. दिवस चांगला जाईल.

मिथुन : कामाची निगडित आज दिवस चांगला आहे. आपल्या कार्यक्षेत्राची वाढ होणार आहे. सहकाऱ्यांचे उत्तम सहाय्य मिळेल. एकूणच दिवस ताण असला तरी आनंद घेऊन येणार आहे.

कर्क : "देवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी" असा आजचा दिवस आहे. आपल्याला आवडतात त्या गोष्टीत मन रंगवून घ्याल. सकारात्मकता आणि सात्विकता या दोन्हींनी भारलेला आजचा दिवस आहे. शिव उपासना फलदायी ठरेल.

सिंह : न केलेल्या गोष्टींचे परिणाम माथी येतील. आपण कुठेतरी अडकतो एका काय ही भावना येईल. म्हणून वाईट गोष्टींच्याकडे कल न ठेवता आपला मार्ग निवडा. आपण चांगल्या पथावर चला.

कन्या : एकूणच दिवस हा सुखाचा राहील. थोडे प्रवास होतील पण त्या प्रवासातून फायदा सुद्धा होईल. जोडीदाराबरोबर दिवस सुखाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टीची वीट रोवाल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Vrishchik Rashi Career: वृश्चिक राशीचे लोक असतात खूपच हट्टी, फक्त त्यांना नडतात 'या' गोष्टी; जाणून घ्या राशीबद्दल...

तूळ : तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. विनाकारण आपल्याविषयी अफवा सुद्धा उठतील. याच्याकडे दुर्लक्ष करणं हाच आजच्यासाठीचा सल्ला आहे.

वृश्चिक : उपासनेसाठी दिवस उत्तम आहे. सुख हे शोधायचं असतं. त्याच्या मागे जायचं नसतं. आहे त्या गोष्टीत समाधान होऊन राहा. सगळ्या बाजूने सकारात्मकता जाणवेल.

धनु : कामाशी निगडित व्यवहार वा जागेची निगडित व्यवहार पूर्ण होतील. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. त्यांच्या सरबराई मध्ये दिवस व्यस्त राहील.

मकर : भावंड सौख्य मिळण्याचा आजचा दिवस आहे. शेजारी सुद्धा सख्य राहील. आपल्या पराक्रमावर आपणच खुश होऊन जाल.

कुंभ : पैसा -अडका याच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणूक कराल. खरेदी कराल. पैसाही येईल संमिश्र दिवस राहील .

मीन : "चिंब भिजलेले रूप सजलेले" असा आजचा दिवस आहे. मनामध्ये खूप छान सुखाचे तरंग उठतील आणि जीवनावर पुन्हा एकदा प्रेम करावं अशी भावना येईल. दिवस छान जाईल.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya Marathi : आजचे राशी भविष्य, बुधवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com