Makar Sankranti: 19 वर्षांनंतर मकर संक्रातीला बनणार अद्भुत योगायोग; 'या' राशींच्या व्यक्तींच्या नशीबाचा होणार कायापालट

Makar Sankranti 2025: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रहांचा राजा सूर्य देव कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
Makar Sankranti 2025
Makar Sankranti 2025saam tv
Published On

मकर संक्राती अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. यंदाच्या मकर संक्रातीला ग्रहांची चाल देखील उत्तम असणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी ग्रहांचा राजा सूर्य देव कुंभ राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे हा सण 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी 19 वर्षांनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी एक अद्भुत योगायोग घडणार आहे. मकर संक्रांतीला मंगळवार आणि पुष्य नक्षत्राचा दुर्मिळ योगायोग असणार आहे. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, मकर संक्रांतीच्या दिवशी होणारा हा संयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Makar Sankranti 2025
Surya-Shani Yuti: होळीमध्ये शनीची शत्रू ग्रहाशी होणार युती; 'या' राशींवर संकटांचे ढग, मोठी हानी होणार

कर्क रास

मकर संक्रांतीला येणारा दुर्मिळ संयोग कर्क राशीसाठी शुभ असणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमच्या घरी असलेल्या पैशांमध्ये वाढ होऊ शकते. करिअरमध्येही प्रगतीची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठं तुम्ही यश मिळवू शकता. वैवाहिक जीवनात गोडवा राहण्याची शक्यता आहे.

Makar Sankranti 2025
Shani Gochar : मार्च महिन्यात मीन राशी शनी गोचर, चांदीच्या पावलांनी चालणार शनीदेव; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

तूळ रास

मकर संक्रांतीला येणारा अद्भुत योगायोगही तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल मानला जाणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत. पैशाची बचत करण्यात यश मिळू शकणार आहे. जुन्या आजारापासून तुम्हाला आराम मिळू शकणार आहे.

Makar Sankranti 2025
१०० वर्षांनंतर होणार सूर्य ग्रहण आणि सूर्य-शनीच्या युतीचा संयोग; 'या' राशींना मिळणार अपार पैसा, मान-सन्मान मिळेल

मीन रास

मीन राशीसाठी मकर संक्रांत अत्यंत शुभ मानली जातेय. विशेष योगायोगामुळे व्यवसायात नफा वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते. याशिवाय व्यवसायात दुप्पट फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे.

Makar Sankranti 2025
Neechbhang Rajyog: बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश करताच बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीत मिळणार नफा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com