Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यातील राशिभविष्यानुसार काही राशींच्या लोकांनी विशेषतः आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे काही राशींवर ताण, थकवा आणि लहान-मोठ्या आजारांचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी यावी लागेल. चंद्र-गुरू शुभयोगामुळे तरुणांचे विवाह जमतील. भागीदारीमधील व्यवसाय फायदेशीर होईल. कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निकाल लागतील.

वृषभ

शेअर्ससारख्या व्यवसायात पैसेअडकतील. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. कोर्टकचेरीमधून आर्थिक लाभ होतील.

मिथुन

घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. पूर्वार्धात मानसिक स्थिती खराब राहील. चंद्र-गुरू शुभयोगामुळे शेअर्ससारख्या व्यवसायात होईल. आरोग्यात चांगली सुधारणा होईल.

कर्क

महत्त्वाचे पत्रव्यवहार, कागदपत्रास विलंब होईल. कायदेशीर कामात मनस्ताप होईल. चंद्र-गुरू योगामुळे घर-प्रॉपर्टी, वाहन खरेदी होईल. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. गुरूजनांची भेट होईल.

सिंह

सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी गुंतवणूक कराल. कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागेल. भावंडांशी सुसंवाद राहील. महत्त्वाची कागदपत्रे मिळतील. वारसा हक्काच्या कामाला गती मिळेल.

कन्या

जोडीदाराशी मतभेद टाळावेत. मन अशांत राहील. मात्र उत्तरार्धात चंद्र-गुरू शुभयोगामुळे नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Budhaditya Rajyog: 12 महिन्यांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल बुधादित्य योग; 'या' राशींना मिळू शकणार पद-प्रतिष्ठा

तूळ

सप्ताहाच्या सुरुवातीला मोठे खर्च होतील. कर्जाचा ताण सहन करावा लागेल. परदेश किंवा दूरच्या प्रवासात अडथळे येतील. चंद्र-शनी शुभयोगामुळे नोकरीत पगारवाढ होईल. कौटुंबिक समस्यावर मार्ग काढाल.

वृश्चिक

सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या गाठीभेटी होतील. व्हिसा पासपोर्टच्या कामात यश मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. चंद्र-शनी योगामुळे गूढशास्त्रातील आवड वाढेल. मुलांच्या समस्या सुटतील

धनू

घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू शुभयोगामुळे तरुणांचे विवाह जमतील. कोर्टकचेरीमध्ये यश मिळेल मोठी इच्छा पूर्ण होईल. मोठा लाभ होईल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल.

मकर

सप्ताहाच्या सुरवातीला महत्वाच्या कामात व्यत्यय येईल. मोठी संधी निसटून जाण्याची भीती वाटेल. मुलाखतीमध्ये अपयश संभवते. विद्यार्थ्यांना यश कठीण राहील.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Navpancham Rajyog 2025: 10 ऑगस्टपासून 'या' राशींचं नशीब पालटणार; मंगळ-यम बनवणार शक्तीशाली नवपंचम राजयोग

कुंभ

आर्थिक कामात अडथळे येतील. पैसे अडकण्याची शक्यता राहील. मात्र, चंद्र-गुरू शुभयोगामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थीना मना सारखे यश मिळेल. नावलौकिक-प्रसिद्धी मिळेल.

मीन

सप्ताहाच्या सुरवातीत जोडीदाराशी मतभेद संभवतात. विवाहसौख्यात मनस्ताप संभवतो. भागीदारीमध्ये कटकटी संभवतात. कोर्टकचेरीमध्ये अपयश येईल. तीर्थयात्रा घडेल.

पुढील सात दिवस या 4 राशींवर होईल लक्ष्मी देवीची कृपा, वाचा राशिभविष्य
Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com