Navpancham Rajyog 2025: 10 ऑगस्टपासून 'या' राशींचं नशीब पालटणार; मंगळ-यम बनवणार शक्तीशाली नवपंचम राजयोग

Mars Jupiter yog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीतील बदलामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होत असतात. १० ऑगस्ट २०२५ पासून मंगळ आणि गुरू यांच्या स्थितीमुळे एक अत्यंत शक्तिशाली असा 'नवपंचम राजयोग' तयार होत आहे.
Navpancham Rajyog
Navpancham Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ साधारणपणे ४५ दिवसांनी त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी त्याचा प्रभाव देश-विदेशात ठळकपणे जाणवतो. सध्या मंगळ कन्या राशीत आहे. या स्थितीत तो शनीसोबत समसप्तक योग आणि कुंभ राशीतल्या राहूसोबत षडाष्टक योग तयार करत आहे.

१० ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांनी मंगळ आणि यम १२० अंशांवर येऊन शक्तिशाली नवपंचम राजयोग निर्माण करणार आहेत. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींना यामुळे चांगल्या संधी मिळणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Navpancham Rajyog
November Grah Gochar 2024: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा

मेष रास

मेष राशीसाठी हा नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बराच काळ थांबलेली कामं पूर्ण होतील. लक्झरी वस्तू मिळण्याचे योग आहेत. आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. आरोग्य सुधारेल. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मान-सन्मान वाढेल आणि जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत.

कर्क रास

कर्क राशीसाठी हा योग अनुकूल आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कर्मस्थानाचा स्वामी लाभभावात असल्याने अडकलेली कामं पुन्हा सुरू होतील. प्रेमसंबंधांमध्येही भाग्याची साथ मिळणार आहे. मित्रांसोबतचे संबंध उत्तम राहतील आणि आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Navpancham Rajyog
Surya Gochar: 17 ऑगस्टपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; सूर्याच्या गोचरमुळे धन-संपत्तीमध्ये होणार भरमसाठ वाढ

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी मंगळ-यम संयोगाने तयार झालेला नवपंचम राजयोग फायद्याचा ठरणार आहे. अनेक क्षेत्रांत मोठं यश मिळेल. जुन्या अडकलेल्या कामांना गती येईल. उत्पन्न झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. भावंडांशी संबंध दृढ होतील. शत्रूंवर विजय मिळेल आणि मित्रांकडून मदत मिळेल.

Navpancham Rajyog
August 2025 Planets Transits: ऑगस्टमधील ग्रहांच्या गोचरमुळे 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य; आपोआप मिळणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com