Monday Horoscope : भाग्यचे द्वार आपोआप खुले होणार; ५ राशींच्या लोकांच्या हातून पुण्यकारक गोष्टी घडणार

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या भाग्यचे द्वार आपोआप खुले होतील. तर काही लोकांच्या हातून पुण्यकारक गोष्टी घडतील. वाचा सोमवारचं राशीभविष्य
horoscope in marathi
Horoscope In MarathiSaam tv
Published On

पंचांग

सोमवार,२७ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष.

तिथी-षष्ठी (अहोरात्र)

नक्षत्र-मूळ

रास-धनु

योग-अतिगंड

करण-कौलव

दिनविशेष-वृद्धितिथी

मेष - मांडीशी निगडीत दुखणे आणि आजार आज विशेष जपावे लागतील. अडचणीतून मार्ग काढून इथपर्यंत आला आहात. भगवंताची विशेष कृपा आज आपल्यावर आहे. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.

वृषभ - मनात नसताना काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकले जाल. आज मात्र सरकारी कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपले कोण परके कोण हे ओळखून पुढे जावे लागेल. कदाचित एकट्याचा मार्ग असा दिवस असेल.

मिथुन - व्यवसायाची नव्याने ओळख होईल. इतर ओळखी करून द्या. घवघवीत यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. कोर्टाच्या कामातही यश मिळेल.

horoscope in marathi
Vastu Tips: किचनमध्ये भांडी किंवा अन्न सतत खाली पडतंय? या संकेताकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

कर्क- तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. खराब, बाधित पाण्यापासून त्रास होण्याचा संभव आहे. मनस्थिती सांभाळावी लागेल. अडचणींचा सामना करून पुढे जा. दिवस संमिश्र आहे.

सिंह - उपासना मार्गांमधून यश मिळेल. रवी उपासना विशेष फायदेशीर ठरेल. आपला इतरांवर थोडा वरचढपणा राहणार आहे. समाजामध्ये मान वाढेल. कामाच्या ठिकाणी मात्र काही गोष्टी संपल्यात जमा असे वाटताना त्या गोष्टी सहज होतील.

कन्या - आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेतीवाडी, गुरढोरे यामधून धनयोग संभवत आहेत. नव्याने काहीतरी खरेदी करण्याचे योग आहेत.

horoscope in marathi
Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

तुळ - कलाक्षेत्रातील लोकांना आजवर केलेल्या कामाचा फायदा होणार आहे. नव्याने ओळखी होऊन पुढे जाल. भाग्यचे द्वार आपोआप खुले होणार आहे. भावंड सौख्य आहे. प्रगती राहील.

वृश्चिक - तिखट, मसालेदार, चटकदार पदार्थ खाण्याची लहर येईल. नवीन व्यवसायाच्या बाबतीत विचार करणार असाल तर कुटुंबीयांशी सल्ला मसलत करून निर्णय घ्या. पैशाची आवक जावक उत्तम राहणार आहे.

धनु - एक वेगळा उत्साह, उमेद तुमच्या मध्ये भरलेली असेल. आपल्या सकारात्मकतेने इतरांना आपलेसे करावे लागेल. वेगळे धाडस आणि साहस करण्यासाठी मन उत्सुक असेल.

horoscope in marathi
Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

मकर - खुलेपणाने हार मानवी लागेल. अडचणींचा ससेमिरा संपणार नाही असे वाटेल. मनोबल जरी खराब असेल तरी जवळच्या लोकांच्या कडून आधार मिळेल असे नाही. अबोला असलेलाच बरं वाटेल.

कुंभ - जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होईल. मनासारख्या घटना घडणार आहेत. मैत्रीचे स्नेहबंध नव्याने जुळून येतील. स्नेहभोजनाची योग आहेत. आपल्या माणसांची कदर आणि आदर दोन्ही कराल.

मीन - प्रसन्नतेचा दिवस आहे. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चला इतरांसाठी काहीतरी पुण्यकारक काम करण्यासाठी आज पुढे व्हाल. भगवंत चांगल्या कर्माचे फळ आपल्याला निश्चित देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com