
आजचे पंचांग
सोमवार,१५ सप्टेंबर २०२५,भाद्रपद कृष्णपक्ष,अविधवा नवमी,नवमी श्राध्द.
तिथी-नवमी २५|३२
रास- मिथुन
नक्षत्र-मृग
योग- व्यतिपात
करण-तैतिल
दिनविशेष-व्यतिपात वर्ज्य
मेष - धावपळ , दगदग आज दिवसभरात वाढणार आहे. मात्र काहीतरी वेगळा पराक्रम आज कराल. आत्मविश्वास, जिद्द चिकाटीने येणाऱ्या अडचणींवर मात कराल आणि यश मिळवाल.
वृषभ - धनयोग उत्तम आहेत. वारसा हक्काच्या प्रॉपर्टीशी निगडित काही व्यवहार किंवा बैठका असतील तर आज त्या पार पडतील. स्नेहभोजनाचे योग आहेत.
मिथुन - वक्तृत्व उत्तम असणारी आपली रास आहे. बोलण्यामधून समोरच्याचे मन जिंकाल अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी धडपड करावी लागेल.
कर्क - मनस्ताप वाढवणाऱ्या घटना घडतील. न केलेल्या गोष्टींचे खापर आपल्यावर येईल. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. अध्यात्मिक कास धरल्यास दिवस बरा राहील.
सिंह - मैत्री मधून लाभ संभावत आहेत. जुनी येणी वसूल होतील. धडपड करून मिळालेले यश हे कायमस्वरूपी असते हे जाणवेल. दान, दानत सुद्धा चांगली राहील.
कन्या - करियर फोफावेल. समाजकारणामध्ये हिरीरिने सहभाग घ्याल. हिशोबाशी निगडित काही गोष्टी असतील तर असत्या मार्गी लागतील. कामाचे क्षेत्र नवीन संधी उपलब्ध करून देईल.
तुळ - देवी उपासना फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. भाग्यकारक घटना आणि सुवार्ता कानी येणार आहेत. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल.
वृश्चिक - गुप्तधनाची आस वाढेल. कदाचित त्यासाठी विशेष प्रयत्न कराल. काहीतरी गोष्टीचे गूढ शोधण्यासाठी आज प्रयास असेल. एकटेपणाची भावना पण निर्माण होईल.
धनु - व्यवसायामध्ये अनेक टप्पे आज चांगले येतील. आणि ते सहज पारही होतील. सद्गुरूंची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे. नव्या सृजनशील गोष्टींमध्ये सहभाग घ्यायला हरकत नाही.
मकर - जुने, चिकट रोग- आजार आज डोके वर काढतील. कामात येणाऱ्या अडचणी बोलून सोडवल्यानंतर सहज मार्ग निघेल. गुप्त शत्रू त्रास देतील.
कुंभ - संशोधनात्मक वृत्ती वाढीस लागेल. नव्याने काहीतरी शिकण्यासाठी धडपड करायला विद्यार्थ्यांना दिवस उत्तम आहे. आपले प्रज्ञा वैभव, संतती सौख्याला दिवस चांगला आहे.
मीन - घरी एखादे धार्मिक कार्य होईल. मातृसौख्य, वाहनसौख्य, गृहसौख्य यासाठी दिवस उत्तम आहे. नव्याने काही खरेदी करायचे असेल तर आज आवश्य करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.