आजचे पंचांग
गुरुवार,७ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष.
तिथी-षष्ठी२४|३५
रास-धनु १७|५४ नं.मकर
नक्षत्र-पूर्वषाढा
योग- धृति
करण-कौलव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - नातवंडांकडून काही चांगल्या बातम्या कानावर येतील. कदाचित त्यांच्या मदतीमुळे तीर्थक्षेत्री भेट देण्याचे योग आहेत. सद्गुरु भेटतील. न ठरवलेल्या गोष्टी अचानक घडताना दिसतील.
वृषभ - अचानक धनालाभाची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. भले ते गुप्तधन असेल, आपल्या जोडीदाराकडून पैसा असेल किंवा वामार्गातून मिळालेला असू शकतो. दिवस धावपळीचा आहे.
मिथुन - व्यापार , व्यवसायात वृद्धीचा आजचा दिवस आहे. विवाह ठरतील योग्य मार्गावर पथक्रमण होईल. दिवस आनंदी आहे.
कर्क - आपले शत्रू आपल्याला त्रास देतील. कामाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. काही गोष्टी गुप्त ठेवणे आज बरे राहील. नातेवाईकांकडून त्रास संभवतो आहे.
सिंह - रवी उपासना फलदायी ठरेल. धनाशी निगडित उलाढाली घडतील. शेअर्स मधली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रेमाने जग जिंकाल. सृजनशीलता वाढेल.
कन्या - कुटुंबीयांकडून आपले कौतुक होईल. कामाचा जोर वाढेल. जागेचे व्यवहार, शेती - बागायती यामध्ये दिवस व्यस्त राहील. नवीन कल्पनांचा उगम होईल.
तुळ - मानसन्मान पारितोषिके मिळण्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या कामाचे चीज होताना दिसेल. भावंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
वृश्चिक- आजच्या दिवशी पैसा जपणे गरजेचे आहे. "साठवलेले पुरत नसले तरी सरत नाही" हेही लक्षात ठेवा. योग्य गुंतवणूक होईल. धन योगाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
धनु - द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे लागेल. आपल्या निर्णयावर ठाम राहाल. इतरांवर आपला पगडा राहील. सकारात्मकतेने दिवसाची वाटचाल कराल.
मकर - "चिखलाने माखले ते शेल्याने झाकले" असा आजचा दिवस राहील. आपल्या चुका ह्या तुम्हालाच पदरात घ्यावा लागतील. विनाकारण मनस्ताप टाळा. इतरांना दूषणे देणे कमी करा.
मीन - मोठी गुंतवणूक आणि त्यापासून फायद्याचा आजचा दिवस आहे. केलेल्या सत्कार्याचा योग्य मोबदला मिळताना आपल्याला दिसेल. दिवस सजग आणि आनंदी राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.