Friday Horoscope : भगवान श्रीकृष्णाची कृपा होणार; 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची कृपा होईल. तर काहींच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडतील.
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

आजचे पंचांग

शुक्रवार,१५ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,श्रीकृष्ण जयंती,स्वातंत्र्य दिन.

तिथी-सप्तमी २३|५०

रास-मेष

नक्षत्र-अश्विनी ०७|३५

भरणी- ३०|०६

योग-गंड योग

करण-विष्टीकरण

दिनविशेष-आनंदी दिवस

मेष - आज श्रीकृष्ण जयंती आहे. असाही आपला दिवस धामधुमीत जाणार आहे. धावपळ,गडबड वेगळे काही करण्याची अचाट जिद्द आज तुमच्यामध्ये असणार आहे. दिवस चांगला जाईल.

वृषभ -मनासारख्या गोष्टी घडतील म्हणून हातावर हात धरून बसणे योग्य नाही. तर मनासारखे करण्यासाठी विशेष धडपड आज करावी लागेल. मनोबल कमी राहील. पण त्यातून कामे सुकर करण्याच्या मागे लागाल. खर्चावर धरबंध नसेल.

मिथुन -मित्र-मैत्रिणींच्या टोळक्यामध्ये मस्त,गुंग राहाल. वेगळे काहीतरी नव्याने करण्याची उर्मी आज जागृत होईल. कानाशी निगडित आजार असतील तर त्याचा थोडा त्रास होऊ शकतो.काळजी घ्या.

horoscope in marathi
Home Vastu Tips: नवीन घर बांधताना 'या' वास्तु नियमांकडे लक्ष द्या, अन्यथा त्रास होऊ शकतो

कर्क -समाजकारणामध्ये हिरीरीने सहभाग घ्याल. एखाद्या राजकारणी व्यक्तीबरोबर संबंध दृढ होतील. प्रवासासाठी किंवा कामासाठी प्रवास अशा दोन्हीसाठी दिवस चांगला आहे. वाहनांचे सैर मौज आणेल.

सिंह - "अबोल प्रीत बहरली"असा काहीसा दिवस प्रेमीजनांसाठी आहे. एकमेकांवर प्रेम करण्यात मशगुल राहाल.आनंदाच्या वार्ता कानी येतील. भाग्यकारक घटना घडतील.दिवस चांगला आहे. श्रीकृष्ण उपासना आज करावी.

कन्या- जोडीदाराच्या कुटुंबीयांच्याकडून विशेष धनयोग आहेत. अचानक पैसा मिळेल. गुप्तधनाचे मार्ग सुकर होतील. कुठल्यातरी गोष्टीने प्रेरित होऊन उठाल. धावपळीमध्ये व्यस्त रहाल.

horoscope in marathi
Vastu Tips: भाद्रपद महिन्यात तुळशीला अर्पण करा 'ही' खास वस्तू, होतील आर्थिक लाभ

तूळ - प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य,स्नेहबंध, ममत्व हे सर्व सहजगत्या आपल्याच व्यक्तीकडून आज मिळणार आहे. त्यामुळे दिवस उत्तम राहील. मनामध्ये एक भारावलेपण असेल.मनोरंजनात्मक गोष्टीत सहभागी व्हाल.

वृश्चिक - जुनी दुखणे, आजार डोके वर काढतील. कदाचित मूत्रपिंडाचे निगडित आजार होण्याची आज शक्यता आहे. आपले कोण परके कोण हे ओळखून पुढे चला, पुढे वाटचाल करा.महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.

धनु - उपासनेसाठी दिवस उत्तम आहे.श्रीकृष्ण उपासना आज जयंती निमित्त करावी. त्याचे द्विगुणीत फळ तुमच्या पदरात आज येणार आहे. सुखाचे मार्ग सुकर होतील. धनयोग उत्तम आहेत. शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

horoscope in marathi
Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

मकर - जुन्या काही गोष्टी मग गाडी असेल, जागा असेल घर असेल याच्याशी निगडित आज काही व्यवहार होतील. नव्याने गोष्टी काही करायचं असतील तर आज कल्पना सुचतील. कष्टाला पर्याय नाही हे समजून जाईल.

कुंभ - लेखन क्षेत्रामध्ये प्रगती होईल. जवळच्या प्रवासातून पत्रव्यवहारांमधून फायदा होईल. शेजारी संबंध दृढ होतील. भावंड सौख्य उत्तम आहे. काळजी नसावी.

मीन - पैशालाच पैसा जोडता येतो हे आज जाणवेल. गुंतवणुकी मधून फायदा आहे. मोठ्या काहीतरी गोष्टी मनासारख्या करण्याचा मानस आज पूर्ण होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com