
आजचे पंचांग
शुक्रवार,१८ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.
तिथी-अष्टमी १७|०२
रास-मेष
नक्षत्र-अश्विनी
योग-सुकर्मा ०६|४८
धृति २७|५६
करण-कौलव १७|०२
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - "मन नाजूकशी मोतीमाळ"असा आजचा दिवस आहे. कोमल मनाला भावनेचे उमारे येतील. राशीचा स्वभाव मूळचा गळून पडेल. आनंदासाठी सर्व काही कराल. सकारात्मकता वाढीला लागेल.
वृषभ - ठरवून केलेल्या नियोजित असलेल्या गोष्टी सगळ्या तशाच पार पडत नसतात हे समजून घ्या. आज त्यामध्ये अडथळे येतील. विनाकारण मानसिकता घालमेलीची राहील. प्रेमामध्ये सुद्धा अपयश संभवते आहे. काळजी घ्या.
मिथुन - नको असणारे खर्च आणि कटकटी वाढतील. तब्येतीच्या तक्रारींमध्ये भर पडेल. पण एका बाजूला काही चांगल्या घटना ज्या जुन्या गुंतवणुकीशी निगडित केल्या होत्या त्यामध्ये भरभराट होईल.
कर्क - वाहनांची विशेष आवड आपल्याला आहे. ती जपण्यासाठी प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी बदलीचे आणि फीरतीचे योग आहेत. नेटाने,सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहाल.
सिंह - जीवनात जे चालू आहे जे मिळाले आहे याविषयी आज कृतज्ञता बाळगाल. थोडा दानधर्म आणि अध्यात्माकडे कल राहील असे दिसते आहे. आपुलकीची आणि जवळची माणसे जवळ असतील.
कन्या - कष्टाला पारावर राहणार नाही. काही गोष्टी शारीरिक मेहनतीपेक्षा बौद्धिक चाल आज खेळाल. मुळामध्ये अपेक्षित यश गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. उशिरा का होईना पण यश मिळेल.
तूळ - प्रेमाच्या आठवणीत मन रमेल. मनोरंजनात्मक गोष्टी घडतील. दिवस सुखाची मशाल घेऊन आलेला आहे. भागीदाराने जोडीदार यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळेल.
वृश्चिक - आपल्या वाईटावर असणाऱ्या लोकांना आज आयते कोलीत हातात मिळेल. नको असलेल्या गोष्टींचा भडीमार आपल्यावर होईल. कार्य करताना अडथळे येतील. पण परिस्थितीशी नक्की दोनहात कराल.
धनु- दत्तगुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. धनलाभ मध्ये भर पडेल. नव नवीन कल्पनांनी भारलेला आजचा दिवस असेल. विद्यार्थ्यांना सुसंधी प्राप्त होतील.
मकर - जुने घर नवे करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज त्या कामाला मुहूर्त मिळेल. घर खरेदी विक्री मध्ये विशेष फायदा आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करावी लागेल. असलेल्या गोष्टीत सुख मानाल. दिवस संमिश्र आहे.
कुंभ- जवळचे प्रवास घडतील. पत्रव्यवहाराला दिवस चांगला आहे. महत्त्वाच्या गोष्टी आज ठामपणे करा. वेगळा आत्मविश्वास घेऊन वावराल. संशोधनात्मक कार्य आज आपल्याकडून होईल.
मीन - धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. आपल्या चांगल्या स्वभावामुळे कुटुंबीयांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल. कदाचित घरातील काही बिनसलेल्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी सांधण्याचा दुवा तुम्ही असाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.