वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह आणि नक्षत्र ठराविक अंतराने राशिचक्र आणि नक्षत्र बदलतात. ज्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंत 12 राशींवरही पडतो. द्रिक पंचांगनुसार सूर्य 16 जुलै 2024 रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल. हा शुभ योग काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरेल. मात्र सूर्याच्या कर्क राशीत प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांना आयुष्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. यातच कोणत्या राशींना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, हे जाणून घेऊ...
सिंह : सूर्य संक्रमणानंतर सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात भावनिक अस्वस्थता वाढेल. भूतकाळातील आठवणी मनाला त्रास देतील. अज्ञात भीतीमुळे मन अस्वस्थ राहील. या काळात स्वतःसोबत वेळ घालवा. राग करणं टाळा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्या विचार करून सोडवा. यश मिळविण्यासाठी धीर धरा आणि कठोर परिश्रम करा.
धनु : सूर्याच्या चालीतील बदलामुळे धनु राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक मोठे बदल घडतील. कामाचा ताण वाढेल. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. कार्यालयात विरोधक सक्रिय दिसतील. कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या. नात्यातील समस्या हुशारीने सोडवा. संपूर्ण माहिती घेल्याशिवाय गुंतवणूक करू नका.
कुंभ : सूर्याने आपली राशी बदलल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये खूप व्यस्त वेळापत्रक असेल. कामाचा ताण वाढेल. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. कार्यालयात स्पर्धेचे वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. सकारात्मक राहा. अडचणींना घाबरू नका. करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीत सावध राहा.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.