Horoscope : बुध-मंगळाचा शक्तिशाली'केंद्र दृष्टी'योग! २ ऑक्टोबरपासून ४ राशींचे नशीब चमकणार, होणार अपार धनलाभ

Budh Mangal Yog effects : २ ऑक्टोबरपासून बुध-मंगळाचा केंद्र दृष्टी योग तयार होणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मकर राशींवर या योगाचा सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता जाणून घ्या.
Budh-Mangal Kendra Drishti Yog
Budh-Mangal Kendra Drishti Yogसाम टीव्ही मराठी (AI)
Published On: 

Budh-Mangal Kendra Drishti Yog : ज्योतिष शास्त्रानुसार, २ ऑक्टोबरला ग्रहांची दुर्मिळ स्थिती निर्माण होणार आहे. बुध-मंगळाचा शक्तिशाली 'केंद्र दृष्टि' योग तयार होणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून ९० अंशाच्या कोनात येणार आहेत, याचा परिणाम ४ राशींवर सकारात्मक होणार आहे. हे दोन ग्रह एकमेकांसमोर केंद्र स्थानात येतात त्यावेळी कठीण परिस्थितीतही मोठा आर्थिक फायदा आणि यश मिळण्याची क्षमता निर्माण होते. या खास योगामुळे ४ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. यात तुमची रास आहे का? जाणून घ्या

मिथुन (Gemini):

मिथुन राशीचा स्वामी बुधच आहे. केंद्र दृष्टी योगामुळे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप सुधारणा होईल. व्यवसाय, आयटी, मार्केटिंग किंवा मीडिया क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठी डील मिळू शकते. जुने अडकलेले पैसे परत मिळून तुमची आर्थिक स्थिती भक्कम होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo):

कन्या राशीच्या कर्म भावात केंद्र दृष्टी योग बनत असल्याने नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात मोठी जबाबदारी मिळेल. अथवा नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. प्रमोशन किंवा पगारवाढीचा मार्ग मोकळा होईल. रिअल इस्टेटच्या व्यवसायातही मोठा नफा होऊ शकतो.

Budh-Mangal Kendra Drishti Yog
सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

वृश्चिक (Scorpio):

वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः मंगळ आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही नवीन कामात तुम्हाला झटपट यश मिळेल. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीणातील कठीण आव्हाने सहज पार कराल.

मकर (Capricorn):

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्य आणि कामात उत्तम संतुलन आणेल. नवीन गाडी, घर किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात किंवा व्यवसायात मोठे यश मिळेल आणि कुटुंबातील जुने मतभेद मिटून शांतता लाभेल.

Budh-Mangal Kendra Drishti Yog
House Painting : सणासुदीत भाड्याचं घर रंगवायचंय? पैसे कोण देणार? मालक की भाडेकरू; 'हा' नियम वाचून धक्काच बसेल

डिस्क्लेमर (Disclaimer):

ही माहिती केवळ ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. या लेखातील माहितीची अचूकता किंवा पूर्णतेबाबत कोणताही दावा केला जात नाही. कोणत्याही उपायाची किंवा माहितीची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञ किंवा ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com