

मेष : आज दिवसभरात नोकरीची नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. प्रवासादरम्यान घेतलेली छोटीशी काळजी फायदेशीर ठरेल.
वृषभ : कुटुंबात लग्न समारंभामुळे आनंदी वातावरण राहील. रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरले. समाजात सन्मान आणखी वाढेल.
मिथुन : घरी पाहुणे येतील. तुमच्या आवडत्या क्षेत्रातील व्यक्तीची भेट होईल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तुमचं कौतुक करण्याची शक्यता आहे.
कर्क : आज सुख-सुविधा वाढतील. कार किंवा दुचाकी खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे. संयम ठेवावा लागेल, सरकारी कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंह : व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत मिळतील. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. आध्यात्मिक विचाराकडे मन झुकण्याची शक्यता आहे.
कन्या : कार्यालयात तुमच्या कामाचं कौतुक होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. वाणीत गोडवा ठेवल्याने नात्यातील कटुता दूर होईल .
वृश्चिक : धन आणि आरोग्याबाबत सतर्क राहावे लागेल. जुने वाद संपुष्टात आल्याने मन हल्क होईल. कोणताही विचार न करता निर्णय घेणे नुकसानदायक ठरेल.
तुला : विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घेण्यात आलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. व्यवसायातील नवी योजना फायदेशीर ठरेल. आर्थिक गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे टाळा.
धनु : तुम्ही जे काम हाती घ्याल, ते यशस्वीरित्या पूर्ण कराल. घर किंवा दुकानाचा गाळा खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. विद्यार्थी ताणतणावापासून दूर राहतील.
मकर : दिवसभरात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामाची नवीन कल्पना भविष्यात फायदेशीर ठरेल. वादविवादापासून दूर राहा.
कुंभ : छोट्या आव्हानाचा सामना करावा लागेल. खर्च वाढल्याने मन चिंतेत राहील. जुन्या चुकांमधून सुधारण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपलेपणा निर्माण होईल. रखडलेले सरकारी कामे पूर्ण होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.