Wednesday Horoscope : ध्येय गाठाल, संधीचं सोनं कराल; 5 राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होतील

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींचे लोक ध्येय गाठतील. तर काहीजण संधीचे सोने करतील. वाचा बुधवारचं राशीभविष्य
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. करिअर आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहील. नातेवाईकांचं सहकार्य मिळेल.

वृषभ : तुम्ही ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न कराल. तुमचे महत्वाचे कार्य पटकन पूर्ण होतील. कुटुंबीयांकडून आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन : ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रूंपासून सावध राहाल. तुमचं आरोग्य चांगलं राहील.

TODAY HOROSCOPE in Marathi
Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

कर्क : जुन्या मित्रांसोबत बोलणे होईल. समाज आणि कुटुंबाला सोबत घेऊन चालावे लागेल. प्रसिद्धी मिळेल.

सिंह : संवाद करताना घाई करू नये. कुटुंबात सु्ख आणि समृद्धी येईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या घडामोडी घडतील.

कन्या : तुमच्या जवळच्या लोकांचा पाठिंबा मिळेल. कुटुंब एकत्रित ठेवण्यावर जोर द्याल. दिवसभरात उपवास करणे फायदेशीर ठरेल.

तुळ : तुमचा इतरांशी समन्वय साधणे फायदेशीर ठरेल. आयुष्यातील कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. ऑफिसमध्ये स्मार्ट काम कराल.

वृश्चिक : तुम्ही आज आनंद आणि उत्साहाने वेळ घालवाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यवसायात आत्मविश्वास उच्च राहील.

धनु :वैयक्तिक गरजा आणि भौतिक सुखसोयींकडे विशेष लक्ष द्याल. समाजातील अनुभवी लोकांची सल्ला घ्याल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल.

TODAY HOROSCOPE in Marathi
Sunday Horoscope : अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

मकर : तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांना गती मिळायला सुरुवात होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. भांडण झाल्यानंतरही भावंडाशी नाते टिकवून ठेवाल.

कुंभ : घरात पाहुण्यांचे येणे सुरुच राहील. आज बचतीवर भर द्याल. कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळेल.

मीन : करिअरची नवी संधी मिळेल. तुमचा प्रवास सुखद होईल. मिळणाऱ्या संधीचे सोने कराल. मनातील शंका दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com