Grah Yuti: 100 वर्षांनी 6 ग्रहांचा दुर्मिळ संयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, लखपती होण्याची शक्यता

Six Planets Auspicious Yog in Pisces : येत्या काळात मीन राशीत ६ ग्रह एकत्रितपणे युती करणार आहेत. यावेळी काही राशींचा त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण जगता येणार आहेत. तर काही राशींना अचानक भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे.
Six Planets Auspicious Yog in Pisces
Six Planets Auspicious Yog in Piscessaam tv
Published On

https://saamtv.esakal.com/horoscope/guru-moon-conjunction-before-holi-gajakesari-yoga-to-bring-wealth-for-these-zodiac-signs-sjk95ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांनी त्यांच्या राशीमध्ये बदल केला की राजयोग किंवा एकाहून अधिक ग्रहांची युती निर्माण होते. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार, येत्या काळात मीन राशीत ६ ग्रह एकत्रितपणे युती करणार आहेत.

राहू आणि शुक्र मार्चमध्ये मीन राशीत आधीच भ्रमण करतायत. त्याच वेळी कर्माचा कर्ता शनि देखील २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर आज २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मीन राशीतही प्रवेश केलाय. यानंतर १४ मार्चपासून सूर्य देखील या राशीत असणार आहे. तर २८ मार्च रोजी चंद्र देखील या राशीत प्रवेश करेल. यामुळे २९ मार्च रोजी मीन राशीत ६ ग्रहांचे दुर्मिळ संयोजन तयार होणार आहे.

Six Planets Auspicious Yog in Pisces
Mahashivratri 2025: 152 वर्षांनी महाशिवरात्रीला होणार ग्रहांचा दुर्मिळ संयोग; 'या' ३ राशींना नव्या नोकरीसह मिळणार धनलाभ

यामुळे या काळात काही राशींचं भविष्य उजळू शकणार आहे. यावेळी काही राशींचा त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण जगता येणार आहेत. तर काही राशींना अचानक भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

सहा ग्रहांचे संयोजन तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य सुधारू शकणार आहे.

Six Planets Auspicious Yog in Pisces
Shani-Rahu Yuti: 30 वर्षानंतर मीन राशीत राहू-शनीची युती; 'या' ३ राशी जगणार ऐशो-आरामाचं आयुष्य

कर्क रास

सहा ग्रहांची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यताही असणार आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे आर्थिक संकट दूर होणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी सहा ग्रहांची युती अनुकूल ठरू शकणार आहे. हा योगायोग तुमच्या राशीच्या चौथ्या घरात तयार होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक लाभाच्या शक्यता वाढणार आहेत. तुमच्या रखडलेल्या कामाला गती येणार आहे. तुमचा आर्थिक ताण कमी होणार आहे.

Six Planets Auspicious Yog in Pisces
Chandra Grahan 2025: 14 मार्चपासून 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ; पैशांच्या नुकसानीसह आरोग्यही बिघडणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com