Shubh Shravani: ‘झी मराठी’वर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘शुभ श्रावणी’ या नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढवली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत दोन मोठे चेहरे छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून वल्लरी विराट दीर्घ काळानंतर पुन्हा मालिकेत दिसणार आहे. तिचे पुनरागमन पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. त्याचबरोबर लोकेश गुप्ते देखील तब्बल नऊ वर्षांनंतर टीव्ही मालिकेत परतत आहे. त्यामुळे मालिकेची स्टारकास्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
झी मराठीने ‘शुभ श्रावणी’ या मालिकेचा प्रोमो शेअर करताना प्रेमाने भरलेल्या घरात राहणारा ‘शुभंकर’ आणि पैशाने भरलेल्या राजवाड्यात राहणारी ‘श्रावणी’ यांची गोड कहाणी असं लिहीत आहे. 'दो दिल बंधे एक डोरिसे' या लोकप्रिय हिंदी मालिकेवर आधारित असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
प्रोमोमध्ये कथानकाची झलक दाखवण्यात आली असून त्यात कौटुंबिक नात्यांचे गुंतागुंतीचे धागे आणि भावनिक क्षण दिसतात. वल्लरी विराटचा नवा लूक आणि लोकेश गुप्तेची पुनरागमन भूमिका या दोन्ही गोष्टी मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. काही नवीन कलाकार देखील मालिकेत असल्याच्या चर्चा असून संपूर्ण कलाकार यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांत मालिकेच्या प्रसारणाची अचूक तारीख जाहीर होईल. चर्चेनुसार, ‘शुभ श्रावणी’ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. प्रोमोमुळे निर्माण झालेली उत्सुकता आणि स्टारकास्टच्या कमबॅकमुळे ही मालिका चर्चेत आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.