Zee Marathi kamali Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ आता एका नाट्यमय टप्प्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत भावनिक आणि संघर्षमय कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या मालिकेत आता पोलिसांची एंट्री झाली असून, कमळी आणि तिची आई सरोज या दोघींवर संकट ओढावले आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये कमळीला पोलिस ताब्यात घेताना दाखवण्यात आले आहे. कॉलेजमध्ये झालेल्या एका पार्टीदरम्यान ड्रग्ज प्रकरण उघडकीस येते आणि त्याचा आरोप थेट कमळीवर ठेवला जातो. निरपराध असूनही तिला अटक करण्यात येते, तर सरोज मुलीला भेटण्यासाठी मुंबईत येते आणि ती स्वतःही संशयाच्या भोवऱ्यात सापडते. पोलिस तिची चौकशी करताना तिला अटक करतात. “मी काही चुकीचं केलं नाही, मी फक्त माझ्या मुलीला शोधायला आलेय,” असं म्हणताना सरोजचा हृदयद्रावक संवाद प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा धागा समोर येत आहे. कमळीच्या आयुष्यातील कटकारस्थान. तिची प्रतिस्पर्धी अनिका आणि तिची आजी कामिनी यांच्या षड्यंत्रामुळेच हे सगळं घडत असल्याचे संकेत मालिकेच्या आगामी भागात दिसणार आहेत. कामिनी ही राजनची पहिली पत्नी असल्याचे आणि कमळीचा व सरोजचा या कुटुंबाशी संबंध असल्याचे रहस्य हळूहळू उलगडत आहे.
आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. आई आणि मुलगी अखेर भेटू शकतील का? की या कारस्थानात त्यांचं नातं कायमचं दुरावेल? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही भागांत मिळणार आहे. ‘कमळी’ मालिकेचा हा नवा ट्रॅक भावनांचा, रहस्यांचा आणि नात्यांच्या गुंतागुंतीचा संगम ठरणार असून, प्रेक्षकांसाठी नक्कीच आणखी उत्कंठावर्धक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.