'बिग बॉस ओटीटी' विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. एल्विश हा एक युट्यूबर देखील आहे. अलिकडेच 'बिग बॉस 18' मध्ये रजत दलालची बाजू मांडताना पाहायला मिळाला. या आधी देखील सापाचे विष प्रकरणात प्रकरणांमुळे एल्विश चर्चेत होता. आता एल्विशवर एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या.
आता पीएफए (पीपल फॉर ॲनिमल्स) कार्यकर्ते आणि रेव्ह पार्टी प्रकरणाचा साक्षीदार सौरभ गुप्ता यांनी एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल केला आहे. एल्विश यादववर साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस ठाण्यात एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सौरभ यूट्यूबर एल्विश यादववर गंभीर आरोप करत म्हणाला की, "एल्विश यादव कारमध्ये त्याच्या सोसायटीत आला आणि त्याला धमक्या देऊ लागला."
सौरभने दिलेल्या माहितीनुसार, एल्विशने खोटी ओळख दाखवून सोसायटीत प्रवेश केला. तसेच एल्विश यादव त्याला आणि त्याच्या भावाला रस्ता अपघातात ठार करू शकतो, अशी धमकी देखील साक्षीदाराला देण्यात आली आहे. सौरभने एल्विश आणि त्याच्या पाठिंब्यात असणाऱ्या लोकांवर सौरभच्या कुटुंबाविषयी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे.
सौरभने दिलेल्या माहितीनुसार, असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात सौरभला, त्याचा भाऊ गौरव गुप्ता आणि नोएडा पोलीसांना एल्विशच्या विरोधात कट रचताना दाखवण्यात आले आहे. तेव्हापासून सौरभला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौरभला त्याचे फेसबुक अकाऊंटही डीएक्टिवेट करावे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.