Mardani 3 poster : राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’चा पहिला लूक; पोस्टर पाहून थक्क व्हाल, रिलीज डेट काय?

Rani Mukerji New Look: राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ पहिला लूक पोस्टर रिलीज झाला. यशराज फिल्म्सने नवरात्रीच्या दिवशी पोस्टर शेअर केले. राणी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे; चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार.
Bollywood thriller Film
Rani Mukerji Mardani 3 saam tv
Published On

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' चा चित्रपटाचा पहिला लूक पोस्टर रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. यामध्ये राणी मुखर्जी एका नव्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेत दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री शिवानी शिवाजी रॉयचे पात्र साकारणार आहे. या चित्रपटाचा ३ भाग हा अभिराज मीनावाला याने दिग्दर्शित केला केला आहे. तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी यश राज फिल्म्स ने या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे.

सोशल मीडियावर यश राज फिल्मसने हे पोस्टर शेअर केले आहे. दुर्गा देवीचे गाणे टाकत नवरात्रीच्या पहिल्याच दिवस हे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. हा मंत्र दुर्गा देवीच्या अफाट शक्ती आणि महिषासुरावर तिचा विजय साजरा करण्यासाठी म्हंटला जातो. देवीच्या महाकाव्यात्मक युद्धाची आणि शिवानीच्या येणार्या लढाईची समांतरता दाखवण्यासाठी ही प्रतिमा तयार केली आहे. शिवानीलाही तिच्या आयुष्यात सगळ्यात भयानक आणि धोकादायक प्रकरणाचा सामना करावा लागतो. त्याचाच विचार करुन हे पोस्टर तयार केले आहे.

Bollywood thriller Film
Dashavatar Collection : 'दशावतार'ची उंच भरारी, दिलीप प्रभावळकर यांच्या चित्रपटानं पार केला तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा

आदित्य चोप्रा निर्मित हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''नवरात्रीच्या पहिल्या शुभ दिवशी, वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी #राणीमुखर्जी मर्दानी ३ मध्ये पोलिसांच्या रुपात परतली आहे. तसेच तिच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २७ फेब्रुवारीला थिएटरमध्येती येत आहे.''

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मर्दानी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केले होते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रॅंचायझीतील दुसरा भाग गोपी पुत्रन यांनी दिग्दर्शित केला आहे.

Bollywood thriller Film
Heart Attack Symptoms: शरीर धडधाकट तरीही Heart Attackचा धोका? तज्ज्ञ सांगतात 'ही' लक्षणे असतील तर..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com