Goutam Halder Died: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विद्या बालनने त्यांच्या चित्रपटात केलं होतं काम

Bengali Filmmaker Goutam Halder: प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते आणि थिएटर कलाकार गौतम हलदर यांचे निधन झाले आहे.
Goutam Halder Died
Goutam Halder DiedSaam Tv
Published On

Bengali Filmmaker Goutam Halder:

प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते आणि थिएटर कलाकार गौतम हलदर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी कोलकाता येथील खासगी रूग्णालयात गौतम हलदर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपट निर्माते गौतम हलदर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षीअखेरचा श्वास घेतला. छातीत दुखू लागल्याने गौतम हलदार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

गौतम हलदर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या 'रक्त कारबी'या नाटकासह ८० स्टेज प्रॉडक्शन्सचे दिग्दर्शन केले आहे. २००३ मध्ये 'भले थेको' या बंगाली चित्रपटातून गौतम हलदर यांनी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. विद्या बालनचाही हा पहिलाच चित्रपट होता.

Goutam Halder Died
Kiran Mane Post: 'आपली लढाई स्वबळावर लढूया...' किरण माने यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत केली खास पोस्ट

गौतम हलदर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत दुख व्यक्त केले जात आहे. अभिनेत्री विद्या बालनने गौतम हलदर यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. माध्यमांशी बोलताना तिने, त्यांच्या निधनाने मी अंत्यत दु:खी असल्याचे म्हटलं आहे.

Goutam Halder Died
Shah Rukh Khan Birthday :शाहरुख खानच्या वाढदिवशीच 'मन्नत'बाहेर चाहत्यांच्या मोबाइलची चोरी; पोलिसांकडून तिघांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com