Vicky Kaushal On Animal & Sam Bahadur Clash: ‘एकाच दिवशी अनेक चित्रपटांचा पर्याय....’, विकीने ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’च्या प्रदर्शनाबद्दल सोडलं मौन...

Animal And Sam Bahadur Clash: बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड क्रेझ दिसत असून डिसेंबर महिन्यात थिएटरमध्ये ‘ॲनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’ एकत्रित प्रदर्शित होणार आहे. यावर अभिनेता विकी कौशलने भाष्य केले आहे.
Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash
Vicky Kaushal on Animal Sam Bahadur ClashSaam Tv
Published On

Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘जवान’, ‘फुकरे ३’, ‘मिशन राणीगंज’ सध्या या तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर एकत्रित स्पर्धा सुरु आहे. त्या आधी ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ देखील एकत्रित बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा दोन बड्या सेलिब्रिटींचे पिक्चर आमने सामने येणार आहेत. त्यामध्ये सहाजिकच कोणाचा चित्रपट सर्वाधिक कमाई करेल?, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash
PVR-INOX Subscription: मनोरंजन प्रेमींसाठी खास ऑफर! ७० रुपयांत पाहाता येणार कोणताही चित्रपट; PVR-INOX चा नवा प्लान

येत्या डिसेंबर महिन्यामध्ये, विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ आणि रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हे दोन्हीही चित्रपट एकाच दिवशी अर्थात १ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नेमका कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नुकताच या स्पर्धेबद्दल अभिनेता विकी कौशलने ‘सॅम बहादुर’च्या टीझर लॉंचिंग इव्हेंटमध्ये भाष्य केलं आहे.

Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash
Shivrayancha Chava Film Create History In Marathi Cinema: दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ने प्रदर्शनाआधीच रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला मराठी चित्रपट

“१ डिसेंबरला माझा आणि रणबीरचा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या हाती देणार आहोत. तो दिवस आमच्यासाठी नाही तर प्रेक्षकांसाठी खास दिवस असेल. आज कालच्या या जमान्यामध्ये, एका इंडस्ट्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकाच दिवशी अनेक चित्रपटांचा पर्याय दिले पाहिजे. त्यामुळेच आपले चित्रपट हिट ठरतील.” असं विकी कौशल म्हणाला.

“आम्हाला असे वातावरण निर्माण करायचे की, एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित झाले तरी त्यांनी भरघोस कमाई करायला हवी. आजकाल प्रेक्षकांमधील उत्साह पाहिला तर, दोन्ही चित्रपट जर चांगल्या कथानकाचे असतील तर दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतील. मी ‘ॲनिमल’ या चित्रपटाकरिता प्रचंड उत्सुक आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतो, स्वतःसाठी नाही.” असं विकी कौशल म्हणाला.

Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash
Bigg Boss 17 Contestant List: ‘बिग बॉस १७’च्या घरात होणार नवीन स्पर्धकांची एन्ट्री; नावेही आली समोर, वाचा संपूर्ण यादी

विकीच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा ​​सॅमच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. नीरज काबी हे जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीरचा ‘ॲनिमल’ आणि विकीचा ‘सॅम बहादूर’ १ डिसेंबरला एकत्रित रिलीज होणार आहेत.

Vicky Kaushal on Animal Sam Bahadur Clash
Hrithik Roshan In Metro: ट्राफिकपासून वाचण्यासाठी हृतिक रोशनने गाठली मेट्रो; प्रवासाचा अनुभव शेअर करत केली पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com