Yogesh Mahajan Death : ज्येष्ठ अभिनेत्याचा मृतदेह घरात आढळला; शुटिंगनंतर झोपले अन् पुन्हा उठलेच नाही

Yogesh Mahajan News : ज्येष्ठ अभिनेते योगेश महाजन यांचं निधन झालंय. त्यांचा घरात मृतदेह आढळला. अभिनेते योगेश महाजन यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे.
Yogesh mahajan News
Yogesh mahajan Saam tv
Published On

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते योगेश महाजन यांचं निधन झालं आहे. ४४ वर्षीय योगेश महाजन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. योगेश महाजन यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तर तसेच त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवरही शोककळा पसरली आहे.

Yogesh mahajan News
Highest Fees Actor: SRK, रणवीर हे कुठंच नाहीत, साऊथच्या हिरोंची फी ऐकून व्हाल चकीत

रिपोर्टनुसार, अभिनेते योगेश महाजन हे 'शिव शक्ती तप त्याग तांडव' मालिकेच्या सेटवर पोहोचले नव्हते. योगेश शुटिंगसाठी सेटवर पोहोचले नसल्याने सह कलाकार, मालिकेचे क्रू मेंबर्स वैतागले. त्यामुळे ते अभिनेते योगेश यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर ते फ्लॅटचा दरवाजा तोडून घरात घुसले. त्यावेळी ते घरात बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Yogesh mahajan News
Top 10 Indian Actors : ना शाहरुख ना सलमान…, 'या' अभिनेत्याला बघायला आवडते प्रेक्षकांना !

ज्येष्ठ अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. योगेश यांनी 'शिव शक्ति तप त्याग तांडव' या मालिकेविरुद्ध 'अदालत', 'जय श्री कृष्णा' , 'चक्रवर्ती अशोक सम्राट' , 'देवों के देव महादेव' सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच त्यांनी मुंबईचे शहाणे, 'संसाराची माया' या सारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Yogesh mahajan News
Katrina Kaif Slap Actor: कतरिना कैफने 'या' अभिनेत्याच्या १६ वेळा मारली कानाखाली ; तुम्हाला हा किस्सा माहिती आहे का?

योगेश यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकार आकांक्षा रावत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, 'ते मनमिळाऊ व्यक्ती होते. त्यांची विनोदबुद्धी चांगली होती. एक वर्षांहून अधिक काळापासून त्यांचासोबत शुटिंग करत होते. त्यांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. योगेश यांच्या जाण्याने त्यांची पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या मुलाने वडिलांचा आधार गमावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com