Bigg Boss Marathi : आईची माया तुम्हाला काय कळणार? निक्कीच्या विधानाने Big Boss च्या घरात राडा

Varsha Usgaonkar - Nikki Tamboli Fight : सध्या सर्वत्र मराठी बिग बॉसची चर्चा पाहायला मिळत आहे. आता निक्की तांबोळीनी आभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत भांडण केले आहे. तिने वैयक्तिक आयुष्यावर टीका करत वाद सुरू केला आहे.
Varsha Usgaonkar - Nikki Tamboli Fight
Bigg Boss Marathi 5SAAM TV
Published On

सध्या बिग बॉसच्या ( Bigg Boss ) घरात खूप धमाल पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉसमध्ये खूप मोठे कलाकार शामिल झाले आहेत. सिनियर आणि ज्युनिअरची जुगलबंदी आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे. या सिजनमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

Varsha Usgaonkar - Nikki Tamboli Fight
Bigg Boss Marathi 5: 'यापुढे मला तुझा पार्टनर नाही बनायचं...', अभिजीतच्या निर्णयाने निक्की पडणार एकटी

बिग बॉसमध्ये वाद ही काय नवीन गोष्ट नाही, पण येथील वादांची कारण मात्र भन्नाट असतात. नुकतेच निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांना 'काय कळणार आईची माया काय असते?' असे विधान करून घरात गदारोळ माजवला आहे. या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकारांनी निक्कीला ट्रोल केले आहे. निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

आता बिग बॉस होस्ट अभिनेता रितेश देशमुख यांनी येथे महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रितेश देशमुखने निक्की तांबोळीला वर्षा उसगांवकर यांची माफी मागायला लावली आहे. रितेशने निक्कीला ( Nikki Tamboli) चांगलेच खडसावले आहे. यावर निक्की उत्तर देते की, 'मी रागाच्या भरात बोलून गेले.'

Varsha Usgaonkar - Nikki Tamboli Fight
Big Boss Marathi 5: निक्कीला पडली कॅप्टनसी भारी; अभिजीतला म्हणाली...

वर्षा उसगांवकर लग्न जीवन

वर्षा उसगांवकर यांनी अनेक छान चित्रपट केले आहेत. वर्षा उसगांवकर यांनी अजय शर्मा सोबत २००० साली लग्नगाठ बांधली. वर्षा उसगांवकर यांनी घरातील लोकांच्या खातर त्यांनी लग्न केले. त्यांना मुळात लग्न करायचे नव्हते. घरच्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी लग्न केले. त्यांच्या बहिणीच्या घरी हे लग्न पार पडले. लग्नाच्या २४ वर्ष झाले असूनही वर्षा उसगांवकर यांना कोणतही मुलंबाळं नाही. निक्की तांबोळीने याच गोष्टीचा फायदा घेऊन वर्षा उसगांवकर यांना सुनावले. यावर वर्षा उसगांवकर गप्प न बसता उत्तर दिल की, 'मुलं पाहिजेत की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि लग्न झालं म्हणजे मुलं पाहिजेच असा काही नियम नाही.'

Varsha Usgaonkar - Nikki Tamboli Fight
Big Boss Marathi 5: निक्की-अरबाजच्या भांडणानंतर बिग बॉसच्या घरात ब्रेकअपची अंताक्षरी; सदस्यांनी दोघांनाही चिडवलं, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com