urvashi Rautela
urvashi Rautela Google

Urvashi Rautela: नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबतच्या डान्स स्टेप्ससाठी उर्वशी ट्रोल, स्पष्टीकरणात मोठं वक्तव्य, म्हणाली...

Urvashi Rautela : उर्वशी रौतेला नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत दाबी दिबिडी या गाण्यात तिच्या डान्समुळे चर्चेत आहे. या गाण्याच्या कोरिओग्राफीमुळे वाद निर्माण झाला असून उर्वशी रौतेलाने यावर भाष्य केले आहे.
Published on

Urvashi Rautela : १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या उर्वशी रौतेला आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा 'डाकू महाराज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळवत आहे.परंतु निर्मात्यांनी प्रदर्शित केल्यापासून 'दाबी दिबिडी' या गाण्याच्या कोरिओग्राफीमुळे या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात येत आहे. नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत गाण्यात काम करणारी उर्वशी रौतेलाने या वादावर आपले विचार मांडले आहेत.

'डाकू महाराज' या चित्रपटातील 'दाबी दिबिडी' या गाण्यात नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत डान्स करण्याचा अनुभव उर्वशी रौतेलाने शेअर केला. एका वृत्तसंस्थेशी बोलताना उर्वशी म्हणाली , "काम करत असताना वेगवेगळ्या चर्चा आणि विविध मते यांचा सामना कलाकारांना करावा लागतो. हा आमच्या या क्षेत्रातील प्रवासाचा एक भाग आहेत. नंदमुरी गरू यांच्यासोबतच्या नृत्याबद्दल समोरयेणाऱ्या विविध दृष्टिकोनांचा मी आदर करते. त्यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करणे हा एक मोठा सन्मान आहे.

urvashi Rautela
Sai Tamhankar: सिनेसृष्टी गाजवल्यानंतर आता सई ताम्हणकर गगनभरारी घेणार ! लवकरच नव्या करियरला सुरूवात करणार

उर्वशी रौतेलाने या गणाच्या डान्समध्ये केलेल्या वादग्रस्त मूव्ह्सचे कला म्हणून वर्णन केले. "नंदमुरी सरांसोबतचा डान्स करणे हा माझ्यासाठी फक्त एक सादरीकरण नव्हे तर कलेचा भाग आहे. त्यांच्यासोबत काम करणे हे स्वप्नपूर्ती सारखे आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक हावभाव एकत्र करून एक सुंदर कलाकृती निर्माण झाली आहे.

urvashi Rautela
Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी कंगना राणौतला मोठा धक्का! शेजारच्या देशात चित्रपटावर घातली बंदी

अलीकडेच, उर्वशी आणि नंदमुरी बालकृष्ण यांचा दाबी दिबिडी गाण्याचे हुक स्टेप सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. बालकृष्णांसोबत सादरीकरण करताना अभिनेत्री अस्वस्थ दिसत असल्याचे नेटकरी या दोन्ही कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रॉल करत आहेत. तसेच या गाण्यात असभ्य अशा स्टेप्स दिल्यामुळे चित्रपटाच्या कलाकारांसह निर्मात्यांनाही ट्रॉल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com