Urfi Javed share new look
Urfi Javed share new lookSaam Tv

Urfi Javed New Video : उर्फीला झालंय काय? 'कसला' व्हिडिओ केलाय शेअर, बघून डोकंच फिरेल...

उर्फी जावेद स्वतःलाच म्हणाली शेमलेस आणि वल्गर.
Published on

Urfi Javed Latest Video: उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनने नेहमीच चर्चेत असते. तिची फॅशन काहींना आवडते तर काहींच्या डोक्यात जाते. परंतु लोकांची पर्वा न करत उर्फी तिचे काम करत असते. उर्फीने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून पाहणारे चक्रावून जाणार आहेत.

Urfi Javed share new look
KL Rahul-Athiya: ठरलं...अथिया-केएल राहुलच्या लग्नाचा बार या तारखेला देणार उडवून...या मुहूर्तावर घेणार सप्तपदी

उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या विचित्र फॅशन आऊटफिटमधील फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. तिच्या या फॅशनमुळे ती ट्रोल देखील होते. परंतु तिला ट्रोल करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तर देण्यात सुद्धा मागे नसते. उर्फी तिच्या फॅशन आऊटफिटसाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरात असते. आता देखील तिने कहर केला आहे. (Social Media)

उर्फीने नुकताच तिचा एका भन्नाट आऊटफिटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. उर्फीने तिच्या व्हिडिओमध्ये घातलेल्या आऊटफिटमध्ये काळ्या रंगाच्या पट्ट्यांचा वापर केला आहे. या पट्ट्या वापरून तिने एक स्विमसूट तयार केला आहे. तसेच तिने केसांना कर्ल करून केस मोकळे ठेवले आहेत. शेमलेस, डिस्टेस्टफ़ूल, वल्गर पण तरीही सुंदर, असे म्हणत तिने तिच्या या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. (Video)

उर्फी सध्या एमटीव्ही स्पिट्सविलामध्ये सहभागी झाली आहे. तिथे ती तिच्या जोडीदाराचा शोध घेत आहे. तसेच ती असे अतरंगी व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com