Urfi Javed: आपल्या अतरंगी फॅशनमुळे सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. मात्र, यावेळी वाद कपड्यांचा नाही तर धर्माचा आहे. सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी एक व्हिडिओ शेअर करत उर्फी जावेदची इस्लाममधून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगत उर्फीचा उल्लेख गीता भारद्वाज असा केलाय.
एवढेच नाही तर तिने तिचे नाव गीता भारद्वाज असे देखील बदलले आहे. आता, उर्फीने फैजानचे दावे फेटाळून लावले आहेत आणि त्यांना मूर्खपणाचे म्हटले आहे. उर्फी म्हणाली, "मी स्वतः खूप पूर्वी धर्म सोडला होता. हे लोक हे सर्व का करत आहेत?"
दरम्यान उर्फीच्या इस्लाम धर्मातील हकालपट्टीचा दावा करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ज्यामुळे 'उर्फीचं धर्मांतर झालं का?' अशा चर्चांना उधाण आलंय. पण या सर्व अफवांवर उर्फीने स्वतं: उत्तर दिलयं मात्र असा कोणताही मौलवी फतवा काढून कुणाला इस्लाम धर्माबाहेर काढू शकत नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.