२०२३ या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम आशयाचे आणि दमदार कथा असलेले सुपरहिट चित्रपट रिलीज झाले आहेत. त्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसादही मिळाला. आता २०२३ प्रमाणेच २०२४ मध्ये प्रेक्षकांना दमदार कथा आणि उत्तम आशय असलेल्या चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या जानेवारी महिन्यात कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत, त्याबद्दल...
‘गदर २’ चित्रपटानंतर अमिषा पटेल ‘तौबा तेरा जलवा’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा हा आगामी चित्रपट येत्या तारखेला रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात जतिन खुराना आणि अमिषा पटेल हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट २०२४ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे. हा चित्रपट येत्या १२ जानेवारीला रिलीज होणार आहे. श्रीराम राघवनच्या या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती दिसणार आहेत.
‘हनुमान’ हा पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात तेजा सज्जा, अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरतकुमार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.
‘कल्कि २८९८ एडी’ हा नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 12 जानेवारीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही प्रदर्शित होणार आहे.
स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी दिसणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.
रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने ‘लाल सलाम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये पोंगल दरम्यान हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘कॅप्टन मिलर’ चित्रपट हा धनुषच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अरुण माथेश्वरन दिग्दर्शित पिरियड फिल्म ३०-४० च्या दशकातील कथा सांगते. धनुष आणि शिवा राजकुमार हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.