'अॅनिमल' चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री तृप्ती डिमरीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तृप्ती नेहमीच आपल्या फॅशनमुळे तिच्या चाहत्यांच्या चर्चेत असते. सध्या तिने एका मुलाखतीमधून तिच्या आयुष्याबद्दलचे गुपीत चाहत्यांसमोर आणले आहे. तृप्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि रिलेशनशीपबद्दल सांगायचे झाले तर तृप्तीचे 'सॅम मर्चंट' सोबत रिलेशन आहे असे म्हटले जाते.
बऱ्याचवेळा ते दोघे सोबत असतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडीयावर शेअर केला आहे. अशातच इंटरव्ह्यूमध्ये तृप्तीने तिला हव्या असलेल्या जोडीदाराबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'कभी हा, कभी ना' या चित्रपटामध्ये असलेल्या अभिनेता शाहरुख खान सारखा जोडीदार मला हवा आहे. 'कभी हा, कभी ना' हा चित्रपट तृप्तीच्या प्रचंड आवडीचा आहे. हा चित्रपट रोमॅंटीक आहे आणि त्यात शाहरुखने उत्तम काम आहे. त्यामुळे हा आपला आवडता चित्रपट असल्याचं तृप्तीने म्हंटलं आहे.
तृप्ती याआधी बुलबूल, लैला मजनू, बॅड न्यूज,अॅनिमल यासारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भुमिकेत दिसली आहे. सध्या तिचा राजकुमार राव सोबतचा 'विकी विद्याचा वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तृप्ती डिमरी हिने तिला कोणत्या प्रकारचा लाइफ पार्टनर हवा आहे हे सांगितले आहे. तृप्ती डिमरी म्हणाली की, ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे.
तृप्तीला शाहरुखच्या 'कभी हान कभी ना' चित्रपटातील नायकासारखा जीवनसाथी हवा आहे. 'कभी हान कभी ना ' या चित्रपटात शाहरुखने एक निरागस प्रेमीची भुमिका साकारली होती. असे चित्रपट तृप्तीला प्रचंड आवडतात, असंही तिने आपली मुलाखतीत म्हंटलं आहे. दरम्यान, तृप्ती डिमरी आगामी काळात विद्या बालन, आणि कार्तिक आर्यनसोबत 'भुल भुलैया3' मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच चित्रीकरण सध्या सुरू आहे.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.