प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिच्या सुंदर सौंदर्यामुळे आणि विनोदामुळे सर्वानांच हसवत असते. भारतीने अनेक कॅामेडी शो करुन सर्व चाहत्यांवर आपली जादू निर्माण केली आहे. भारतीच्या हसमुख स्वभावाने सर्वानांच वेड लावले आहे. त्याचबरोबर तिच्या उत्कृष्ट अॅक्टिंग स्कीलमुळे सर्वांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. भारती नेहमीच चाहत्यांसाठी इंन्स्ट्राग्रामवर नवनवीन फोटो शेअर करत असते. पण सध्या क्यूट दिसणाऱ्या भारती सिंगने आपला वजन कमी करण्याचा प्रवास सुरु केला आहे. वजन कमी करणे हे सर्वांसाठी शक्य नाहीये. पण भारतीने स्वत:वर विश्वास ठेवून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया भारती सिंगचे डाईट आणि आतापर्यंत तिने किती वजन कमी केले आहे.
भारती कधीच जिममध्ये गेली नाही. तिने जिममध्ये न जाता स्वत:चे १५ किलो वजन कमी केले आहे. भारतीने वजन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास केले आहेत. अधूनमधून उपवास म्हणजे ठराविक वेळेत आपला योग्य आहार घेणे आहे. भारतीने आपल्या आहाराकडे खूप लक्ष केद्रिंत केले आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत तिला कधीच आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करावा लागला नाही. भारती नेहमी १६ तास उपवास करते आणि ८ तासांच्या वेळेत आपले आवडते रोजचे जेवण करत असते. भारती नेहमी घरी शिजवलेले अन्न खात असते. तिला बाहेरचे पदार्थ जास्त आवडत नाही. कॅामेडियन भारती संध्याकाळी ७ नंतर जेवण करत नाही. तिच्या आहारात ती पराठे, भाजी, डाळ आणि सर्व आवडत्या पदार्थांचा समावेश करत असते.
भारतीचे वजन कमी करण्याचे हे कठोर परिश्रम सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. वजन कमी करण्याची जिद्द पाहून तिने सर्वानां खूप प्रेरित केले आहे. भारतीने वजन कमी करताना आपल्या आहारात योग्य गोष्टीचीं दिनचर्या राबवली आहे. कधीतरी उपवास करुन सुद्धा माझे आरोग्य खूप निरोगी आणि तंदुरुस्त आहे. भारतीचे जेव्हापासून वजन कमी झाले आहे , तेव्हापासून तिचा दमा आणि मधुमेह नियंत्रणात आहे. भारतीने याबरोबर आपल्या दिनचर्यामध्ये नियमित व्यायाम, वर्कआउट्सचा आणि नाचणे यांसारख्या गोष्टीचां समावेश केला आहे. जास्त वजन असल्यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार सोसावे लागतात. म्हणून योग्यरित्या वजन कमी केल्यामुळे आपण निरोगी शरीर बनवू शकतो.